फिटनेस क्वीन दिशा पाटनीच्या घरी आला ‘नन्हा मेहमान’ सोशल मीडियावर फोटो व्हायरल

फिटनेस क्वीन दिशा पाटनीच्या घरी आला ‘नन्हा मेहमान’ सोशल मीडियावर फोटो व्हायरल

या नव्या पाहूण्याचा फोटो दिशानं तिच्या इन्स्टाग्रामवरून शेअर केला आहे.

  • Share this:

मुंबई, 14 जून : बॉलिवूडची फिटनेस क्वीन दिशा पाटनीनं 13 जूनला 26 वा वाढदिवस साजरा केला. तिच्या बर्थ डेला बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी तिला सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या. बॉयफ्रेंड टायगर श्रॉफनं तर एक स्पेशल व्हिडिओ शेअर करत तिला हटके शुभेच्छा दिल्या. पण या सगळ्याच्या दरम्यान दिशाच्या घरी मात्र एका नव्या पाहूण्याचं आगमन झालं आहे आणि या नव्या पाहूण्याचा फोटो दिशानं तिच्या इन्स्टाग्रामवरून शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

Happy birthday D! 🍰🍰🍰🔥🔥🔥🐥🐥❤❤❤ @dishapatani

A post shared by Tiger Shroff (@tigerjackieshroff) on

दिशानं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलल्या तिच्या घरातील नव्या पाहूण्याचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. हा पाहूणा दुसरं तिसरं कोणी नाही तर एक मांजर आहे. हा फोटो शेअर करताना दिशानं, ‘कुटुंबात तुझं स्वागत किटी’ असं कॅप्शन या फोटोला दिलं आहे. याशिवाय तिनं या मांजरी सोबतचा एक व्हिडिओसुद्धा तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दिशा किटीसोबत खेळताना दिसत आहे.

VIDEO- क्रिकेट ग्राउंडवर रणवीर गाळतोय घाम तर दीपिका इन्स्टाग्राममध्ये बिझी

 

View this post on Instagram

 

Welcome to the family “keety” ❤️

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

दिशा पाटनी तिच्या बर्थ डेच्या संध्याकाळी टायगर श्रॉफ सोबत दिसली. हे दोघंही त्यांच्या काही कॉमन फ्रेंड्स सोबत डिनरसाठी गेले होते. यावेळी दिशा वेस्टर्न लुक तर टायगर कॅज्युअल लुकमध्ये दिसला. दिशाचा नुकताच रिलीज झालेला भारत सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या सिनेमामध्ये दिशाची भूमिका छोटीशी असली तरी तिनं या भूमिकेतून आपली वेगळी छाप सोडली आहे. या सिनेमामध्ये तिनं काही स्टंट सीन सुद्धा केले आहेत. हा सिनेमा आता लवकरच 200 कोटींच्या क्लबमध्ये सहभागी होईल.

तब्बू समोर ढसाढसा रडला होता सलमान खान, स्वतःनेच सांगितलं कारण

 

View this post on Instagram

 

🌹🌹🌹 #mycalvins @calvinklein

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

सध्या दिशा ‘मलंग’ सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन मोहित सूरी करत असून यात दिशा सोबत आदित्य रॉय कपूर आणि कुणाल खेमू यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

जसलीन नंतर आता 'या' अभिनेत्रीसोबत बिग बॉसच्या घरात एंट्री घेणार अनुप जलोटा?

First published: June 14, 2019, 7:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading