मुंबई, 15 मे- बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनीची तरुणाईमध्ये तुफान क्रेझ आहे. अगदी थोड्या वेळात तिने स्वतःचा असा चाहता वर्ग तयार केला आहे. ती सोशल मीडियावरही फार सक्रिय असते. आपले नवनवीन फोटो आणि व्हिडिओ ती सातत्याने आपल्या चाहत्यांसाठी शेअर करत असते. नुकताच तिने एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. यात ती बटरफ्लाय किक मारण्याचा सराव करताना दिसते. इंटरनेट दिवा दिशाने अप्रतिमरित्या बटरफ्लाय किक मारली. दिशाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर करताने लिहिले की, ‘ट्रेनिंग करणं जमलं नाही. बटरफ्लाय किक शिकण्याचा प्रयत्न करत आहे. अजून लांबचा पल्ला गाठायचा आहे.’ दिशाने हा व्हिडिओ शेअर करताच कमेंटचा भडीमार सुरू झाला.
दिशाचा हा व्हिडिओ पाहून एका युझरने लिहिले की, ‘हा टायगरसोबत राहण्याचा परिणाम आहे.’ दिशाच्या आगामी सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर लवकरच ती सलमान खान आणि कतरिना कैफसोबत ‘भारत’ सिनेमात दिसणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या सिनेमात ती फारच मादक दिसतेय यात काही शंका नाही. येत्या ईदला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. याआधी दिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ यांनी ‘बागी २’ सिनेमात काम केलं होतं. दोघांचा एकत्रित असा हा पहिलाच सिनेमा होता. ‘बागी’प्रमाणे ‘बागी २’ हा सिनेमाही सुपरहिट ठरला होता.