VIDEO : ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान टायगर-दिशा पुन्हा दिसले एकत्र

VIDEO : ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान टायगर-दिशा पुन्हा दिसले एकत्र

Tiger Shroff | Disha Patani | ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान दोघंही पुन्हा एकदा एकमेकांच्या हातात हात घालून एकत्र फिरताना दिसले.

  • Share this:

मुंबई, 28 जून : बॉलिवूडचं क्यूट कपल दिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ यांचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चा मागच्या काही दिवसांपासून सुरू आहेत. जवळपास 3 वर्ष रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर आता त्या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय या दोघांनी घेतल्याच्या चर्चा आहे. तसेच एकमेकांचे विचार जुळत नसल्यानं हे दोघं वेगळे झालेत असंही बोललं जात होतं. मात्र या सगळ्यावर टायगर किंवा दिशानं कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. त्यानंतर आता नुकतेच हे दोघंही पुन्हा एकदा एकमेकांच्या हातात हात घालून एकत्र फिरताना दिसले. त्यामुळे आता टायगर दिशाच्या ब्रेकअपच्या चर्चा फक्त अफवा असून त्यांच्यात सर्वकाही अलबेल असल्याचं समजतं.

सासूच्या निधनाने भावुक नम्रता शिरोडकर, शेअर केल्या भावना

नुकतंच दिशा आणि टायगरला मुंबईच्या रस्त्यांवर एकत्र स्पॉट केलं गेलं. यावेळी दिशानं ब्ल्यू कलरचा लाँग ड्रेस घातला होता. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. तर टायगर नेहमीप्रमाणे कॅज्युअल लुकमध्ये हॅन्डसम दिसत होता. यावेळी त्यांनी एकत्र कॅमेराला एकत्र पोझ दिली आणि कारमध्ये बसून निघून गेले. टायगर आणि दिशा मागच्या 3 वर्षांपासून एमेकांना डेट करत असल्याचं बोललं जातं. मात्र या दोघांनी स्वतःहून कधीच त्याच्या नात्याची कबुली दिलेली नाही किंवा ब्रेकअपच्या चर्चांवरही प्रतिक्रिया दिलेली नाही. ते दोघंही नेहमीच एकमेकांचे चांगले मित्र असल्याचं सांगताना दिसतात.

VIDEO : निकच्या सतर्कतेमुळे मोठ्या दुर्घटनेतून वाचली प्रियांका चोप्रा

 

View this post on Instagram

 

@tigerjackieshroff with @dishapatani Clicked today in #Mumbai . #tigershroff #dishapatani #couplegoals #bollywoodstars #actors #paparazzi #yogenshah @yogenshah_s

A post shared by yogen shah (@yogenshah_s) on

दिशा पाटनी नुकतीच सलमानच्या ‘भारत’ सिनेमात झळकली होती. त्यानंतर आता तिनं आगामी सिनेमा मलंगच्या शूटिंगला सुरुवात केली असून काही दिवसांपूर्वी तिला शूटिंग दरम्यान स्टंट सीन करताना दुखापत झाली होती. तसेच ‘भारत’च्या शूटिंग दरम्यानही तिच्या खांद्याला दुखापत झाली होती. तर टायगरचा काही दिवसांपूर्वी रिलीज झालेला ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’ बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल करू शकला नव्हता. आता तो बागी 3ची तयारी करत असून या सिनेमात त्याच्यासोबत श्रद्धा कपूर दिसणार आहे.

कपूर फॅमिलीमध्ये मलायकाची एंट्री, संजय कपूरच्या पत्नीनं शेअर केला फोटो

=============================================

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! मुंबईवर पाणीबाणीचं सावट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 28, 2019 03:14 PM IST

ताज्या बातम्या