Home /News /entertainment /

VIDEO: सेटवर चिलिंग मूडमध्ये दिसली दिशा पाटनी; गर्ल गॅंगसोबत केला जबरदस्त डान्स

VIDEO: सेटवर चिलिंग मूडमध्ये दिसली दिशा पाटनी; गर्ल गॅंगसोबत केला जबरदस्त डान्स

प्रत्येक कलाकार सततच्या शूटिंगने (Shooting) कंटाळलेला असतो. त्यांना आपला मूड फ्रेश करण्यासाठी एका ब्रेकची गरज असते. या ब्रेकमध्ये ते आपल्या आवडीच्या गोष्टी करून स्वतःला रिफ्रेश करत असतात. असंच काहीसं दिसलं दिशा पाटनीसोबत.

  मुंबई, 2 डिसेंबर-   प्रत्येक कलाकार सततच्या शूटिंगने   (Shooting)   कंटाळलेला असतो. त्यांना आपला मूड फ्रेश करण्यासाठी एका ब्रेकची गरज असते. या ब्रेकमध्ये ते आपल्या आवडीच्या गोष्टी करून स्वतःला रिफ्रेश करत असतात. असंच काहीसं दिसलं दिशा पाटनीसोबत. अभिनेत्री दिशा पाटनीचा   (Disha Patani)  एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल   (Viral Video)   होत आहे. यामध्ये ती गर्ल गॅंग सोबत सेटवर धम्माल डान्स करताना दिसून येत आहे.
  बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी नेहमीच आपल्या स्टायलिश आणि बिनधास्त अंदाजामुळे ओळखली जाते. अभिनेत्री सतत सोशल मीडियावर चर्चेत असते. कधी आपल्या लूकमुळे, कधी चित्रपटांमुळे तर कधी बॉयफ्रेंड टायगर श्रॉफमुळे. मात्र आज अभिनेत्री एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. नुकताच दिशा पाटनीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आणि अभिनेत्रींच्या बिनधास्त मूडची सर्वत्रच चर्चादेखील होत आहे. दिशा पटानीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक नवीन डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ एका चित्रपटाच्या सेटवर शूट करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये दिशा सेटवर इतर मुलींसोबत निकी मिनाजच्या 'हायस्कूल' गाण्यावर परफॉर्म करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये दिशा खूप मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे. तिने ब्लू कलरचा टॉप आणि फ्लेयर्ड पॅन्ट घातली आहे.दिशा पाटनीने हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. 'गर्ल व सेट'. मात्र हा कोणत्या चित्रपटाचा सेट आहे याबद्दल काही खुलासा नाही झाला. (हे वाचा:मेहुण्याला शुभेच्छा देण्यासाठी पोहोचला के.एल.राहुल; अथियासोबत दिल्या पोज) दिशा पाटनी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत व्हिडीओ आणि फोटोच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. तिचा हॉट अँड बोल्ड लूक नेहमीच युजर्सना घायाळ करत असतो. बॉयफ्रेंड टायगर श्रॉफप्रमाणेच अभिनेत्री फारच फिटनेस फ्रिक आहे. ती सतत जिममध्ये घाम गाळताना दिसून येते. तिचा फिटनेस पाहून भलेभले थक्क होतात. पहिल्या चित्रपटापासून ते आत्तापर्यन्त अभिनेत्रीने कमालीचं ट्रान्सफार्मेशन केलं आहे. चित्रपटांमध्ये दिशा पाटनी जबरदस्त स्टंटसुद्धा करताना दिसून येते. इतकंच नव्हे तर इन्स्टाग्रामवर दिशाचे ४७.७ मिलियन फॉलोअर्स आहेत. काही तासांत हा व्हिडीओ जवळवळ सहा लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Disha patani, Entertainment

  पुढील बातम्या