Home /News /entertainment /

राहुल वैद्य आणि दिशा परमारचा साखरपुडा आधीच झालाय? दिशाने केला हा खुलासा

राहुल वैद्य आणि दिशा परमारचा साखरपुडा आधीच झालाय? दिशाने केला हा खुलासा

राहुल वैद्यने (Rahul Vaidya) दिशा परमारला (Disha Parmar) बिग बॉस 14(Bigg Boss 14)च्या घरातून लग्नाची मागणी घातल्यानंतर त्यांचा साखरपुडा आधीच झाला आहे अशा चर्चा सोशल मीडियावर रंगू लागल्या. त्यावर थेट दिशानेच खुलासा केला आहे.

    12 नोव्हेंबर, मुंबई: Bigg Boss14च्या घरातून राहुल वैद्यने (Rahul Vaidya) दिशा परमारला (Disha Parmar) लग्नाची मागणी घातली. त्यानंतर राहुल आणि दिशाचा आधीच साखरपुडा झाला आहे, अशा चर्चांना उधाण आलं. राहुलने बिग बॉसच्या घरी जाण्याआधी दिशासोबत साखरपुडा केला होता. या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या. खुद्द दिशा परमारनेच अशा चर्चांवर खुलासा केला आहे. दिशा म्हणाली, माझा आणि राहुल वैद्यचा साखरपुडा झालेला नाही.  द खबरी नावाच्या एका ट्विटर हँडलवरुन असं ट्वीट करण्यात आलं होतं की, दिशा परमार आणि राहुल वैद्यचा बिग बॉसच्या घरात जाण्याआधीच साखरपुडा झाला आहे. त्यावर दिशा परमारने ट्वीट करत सांगितलं. 'शांत राहा! खोट्या बातम्या पसरवू नका' दिशाच्या ट्विटनंतर या चर्चा कमी झाल्या आहेत. बिग बॉसचा स्पर्धक असलेल्या राहुल वैद्यने 11 नोव्हेंबर रोजी म्हणजेच दिशा परमारच्या वाढदिवसाच्या दिवशीच दिशा परमारला लग्नाची मागणी घातली होती. दिशा आणि राहुलने या आधी एका म्युझिक व्हिडीओमध्ये एकत्र काम केलं आहे. जवळजवळ 2 वर्षांपासून दिशा आणि राहुल एकमेकांना ओळखतात. आता दिशा आणि राहुलची रिअल लाइफ लव्हस्टोरी सुरू होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
    Published by:Amruta Abhyankar
    First published:

    Tags: Bigg boss

    पुढील बातम्या