दिग्दर्शक विजू माने थोडक्यात बचावले, ठाणे मनपाचा भोंगळ कारभार पुन्हा उघडकीस

दिग्दर्शक विजू माने थोडक्यात बचावले, ठाणे मनपाचा भोंगळ कारभार पुन्हा उघडकीस

एका कार्यक्रमानिमित्त ठाण्यातल्या डॉक्टर काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात गेलेल्या दिग्दर्शक विजू माने यांच्यासोबत लिफ्ट बंद झाल्यानं अर्ध्यातच अडकून पडण्याचा जीवघेणा प्रकार घडला.

  • Share this:

मुंबई, 2 डिसेंबर : ठाण्यात एका चित्रपट दिग्दर्शकांसोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. एका कार्यक्रमानिमित्त ठाण्यातल्या डॉक्टर काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात गेलेल्या दिग्दर्शक विजू माने यांच्यासोबत लिफ्ट बंद झाल्यानं अर्ध्यातच अडकून पडण्याचा जीवघेणा प्रकार घडला. विजू माने या नाट्यगृहाच्या व्हिआयपी लिफ्ट मधून कार्यक्रम स्थळी जात असताना अचानक लिफ्ट बंद पडली आणि ते अर्ध्यावरच अडकले. त्यांनी बाहेर निघण्याचा प्रयत्न केला पण त्यांना बाहेर पडता आले नाही. शेवटी नाट्यगृहाच्या सुरक्षाकर्मींच्या अथक प्रयत्नांनंतर विजू माने यांना लिफ्ट मधून सुखरुप बाहेर काढलं गेलं.

विजू माने यांनी त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट करत या बद्दलची माहिती दिली. त्यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवर लिहिलं, ‘डॉक्टर काशिनाथ घाणेकर नाट्यगृह आणि दुरावस्था ही युती कधीच तुटणार नाही. आज माझ्यावरचा जीवघेणा प्रसंग टळला मात्र उद्याचं काही माहित नाही.’ त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. त्यांच्या या पोस्टवर अनेक संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

सलमान खान करणार स्वतःहून 29 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स?

डॉक्टर काशिनाथ नाट्यगृहाची VIP लिफ्ट मुळातच गेल्या अनेक महिन्यांपासून खराब आहे असा प्रकार अनेकदा घडलाय अशी माहिती तिथल्याच कर्मचाऱ्यांनी दिली. त्यामुळे नाट्यगृहात येणा-या एखाद्या व्हिआयपी किंवा सामान्य प्रेक्षकाचा जीव गेल्यावर ठाणे महानगर पालिका जागी होणार का? असा प्रश्न आता विचारला जात आहे.

कधी काळी 5 स्टार हॉटेलमध्ये वेटरचं काम करणारा अभिनेता आज आहे बॉलिवूड सुपरस्टार!

खरं तर ठाण्यातील नाट्यगृहांवर ठाणे मनपा कोट्यावधी रुपये खर्च करते पण तरीही अशा घटना घडतात. त्यामुळे पालिका प्रशासन नाट्यगृहा बाबत किती गंभीर आहेत हे स्पष्ट होतं. काही महिन्यांपूर्वीच अभिनेता सुमित राघवननं नाट्यगृहाच्या दुरावस्थेबद्दल ठाणे मनपाचे सोशल मिडायावर वाभडे काढले होते. त्यात आता हा जीवावर बेतणारा प्रकार म्हणजे ठाण्यात नाट्य संस्कृतीवरील काळा डागच म्हणावा लागेल.

लिव्ह- इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या या 7 जोड्यांनी दुसऱ्यांशी केलं लग्न

Published by: Megha Jethe
First published: December 2, 2019, 1:03 PM IST
Tags: Bollywood

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading