मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'60 वर्षांचा हिरो 20 वर्षाच्या हिरोईनबरोबर रोमान्स...' Vivek Agnihotri च्या ट्विटचा रोख कोणावर?

'60 वर्षांचा हिरो 20 वर्षाच्या हिरोईनबरोबर रोमान्स...' Vivek Agnihotri च्या ट्विटचा रोख कोणावर?

Vivek Agnihotri on laal singh chaddha movie

Vivek Agnihotri on laal singh chaddha movie

विवेक अग्निहोत्री यांनी अप्रत्यक्षपणे आमिर खान आणि अक्षय कुमारवर निशाणा साधल्याचं बोललं जात आहे. त्यांच्या नव्या ट्विटची जबरदस्त चर्चा होत आहे.

    मुंबई 13 ऑगस्ट: आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ सिनेमा अनेक कारणांनी चर्चेत येत आहे. सुरुवातीच्या दोनच दिवसात सिनेमाने विलक्षण कामगिरी दाखवली नसल्याने सिनेमाचे हजारो शो कमी करण्यात आले आहेत. प्रेक्षकांची सुद्धा सिनेमाबद्दल संमिश्र मतं आहेत. या सगळ्यात विवेक अग्निहोत्री यांनी सुद्धा आपलं मत मांडलं आहे. आपल्या बेधडक मतांनी नेहमीच चर्चेत असणारे दिग्दर्शक म्हणून विवेक अग्निहोत्री यांच्याकडे पाहिलं जातं. बॉलिवूडमध्ये वयाचं अंतर असलेले हिरो हिरोईन आणि त्यांचा व स्क्रीन रोमान्स या गोष्टी नेहमीच वादाचा विषय ठरल्या आहेत. एज गॅपच्या याच मुद्द्याला पुन्हा एकदा समोर आणत विवेक यांनी एक ट्विट केलं आहे ज्याची बरीच चर्चा होत आहे. यामध्ये ते लिहितात, “सिनेमा कसा आहे हे वसिरून जा. पण जेव्हा 60 वर्षांचा हिरो 20-30 वर्षांच्या हिरोईनसोबत रोमान्स करण्यासाठी उतावीळ असल्याचं दिसतं, फोटोशॉप करून चेहरा यंग दाखवायचा प्रयत्न करताना दिसतो तेव्हा बॉलिवूडमध्ये काहीतरी मूलभूतपणे चुकीचं आहे हे लक्षात येतं.” या ट्विटचा नेमका निशाणा कोणाकडे आहे हे मात्र समोर आलेलं नाही. यातून विवेक यांचा रोख आमिर आणि अक्षय यांच्याकडे आहे असं सुद्धा म्हटलं जात आहे. काहींनी त्यांच्या या ट्विटला पाठिंबा दिला आहे तर काहींनी त्यांना जुन्या आठवणी जाग्या करून दिल्या आहेत. “सर आठवत असेल तर तुम्हीच आमिर खानच्या PK सिनेमाला पाठिंबा दिला होता. आणि आता तुम्हीच दुसऱ्या बाजूने बोल्ट आहात.” असं एका युजरने लिहिलं आहे. हे ही वाचा- एकीकडे देशाबद्दल वादग्रस्त वक्तव्य; आता Aamir Khan चा 'हर घर तिरंगा' मोहिमेत सहभाग तर दुसरा युजर लिहितो, “फक्त बॉलिवूडवर निशाणा का? रजनीकांत साऊथमध्ये हे वीस वर्ष करत आले आहेत. त्यांना टार्गेट का नाही केलं.” अनेकांनी विवेक यांना बॉलिवूडला बॉयकॉट करायचं ठरवलं आहे असं मत मांडलं आहे. लाल सिंग चड्ढा आणि रक्षाबंधन दोन्ही सिनेमांना प्रेक्षकांचा मिळणार प्रतिसाद फारसा सुखवणारा नाहीये. सिनेमांनी लॉन्ग वीकएंड असतानाही फारशी कामगिरी केली नसल्याचं समोर आलं आहे. आमिरच्या सिनेमाला तर ठिकठिकाणाहून विरोध होताना दिसत आहे. त्यात आता विवेक यांच्या ट्विटची भर पडली आहे असंच म्हणावं लागेल.
    Published by:Rasika Nanal
    First published:

    Tags: Aamir khan, Bollywood News

    पुढील बातम्या