मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

म्हणून मोडला होता अभिषेक आणि करिष्माचा साखरपूडा; इतक्या वर्षांनी समोर आलं सत्य

म्हणून मोडला होता अभिषेक आणि करिष्माचा साखरपूडा; इतक्या वर्षांनी समोर आलं सत्य

अभिषेक बच्चन करिश्मा कपूर

अभिषेक बच्चन करिश्मा कपूर

बी टाऊनचं एकेकाळचं लाइम लाइटमध्ये असलेलं कपल म्हणजे अभिषेक आणि करिश्मा. दोघांचा साखरपूडा होऊनही त्याचं नात तुटलं. त्यांच्या ब्रेकअपबद्दल एका प्रसिद्ध निर्मात्यानं खुलासा केला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Minal Gurav

मुंबई, 23 नोव्हेंबर : बॉलिवूड आणि कलाकारांच्या अफेअर्सच्या चर्चा करू तितक्या कमी आहेत. असंच बॉलिवूडचं एक कपल म्हणजे अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री करिश्मा कपूर. एक काळ असा होता जेव्हा अभिषेक करिश्मा बी टाउनचे सर्वात चर्चेत असलेलं कपल होतं. दोघांची जोडी सर्वांना खूप आवडायची. दोघांचं लग्न होणार होतं. साखरपूडाही झाला होता मात्र असं काही घडलं की दोघांचा साखरपूडा मोडला आणि दोघांच्या नात्यालाही पूर्णविराम मिळाला. दोघांच्या नात्याच्या अनेक गोष्टींच्या आजही चर्चा होत असतात. पण आता अनेक वर्षांनी दोघांच्या नात्याविषयी महत्त्वाचा खुलास समोर आला आहे.

फिल्ममेकर सुनील दर्शन यांनी त्यांच्या एका मुलाखतीत अभिषेक आणि करिश्मा यांच्या नात्याविषयी खुलासा केला आहे. 2000 साली करिश्मा आणि अभिषेक एकमेकांना 5 वर्ष डेट करत होते. त्यांना लग्नही करायचं होतं. पण साखरपुड्यानंतर दोघांचं नातं संपलं. 2000 साली दोघांनी सुनील दर्शन यांच्या हा 'मैंने भी प्यार किया' सिनेमात काम केलं होतं. सुनील यांनी म्हटलंय, शुटींगच्या दरम्यान मी दोघांमध्ये इक्वेशनचा अंदाज घेत होतो. पण हा सिनेमा जोरदार आपटला आणि त्यानंतर दोघांचं नातही संपुष्टात आलं.

हेही वाचा -  Bigg Boss 16 : छोट्या अब्दुवर भडकली उर्वशी; ट्विट करत म्हणाली 'हा काय मूर्खपणा...'

बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत सुनील दर्शन यांनी म्हटलं आहे की, करिश्मा आणि अभिषेक यांच्या नात्याच्या बातम्या खऱ्या होत्या. मी स्वत: त्यांच्या साखरपुड्याला गेलो होतो. अभिषेकही खूप स्वीट होता तर करिश्माही फार चांगली आहे. पण दोघांच्या आयुष्यात लग्नाचा योग नव्हता. सिनेमाच्या शुटींगवेळी माझ्या लक्षात आलं की दोघांमध्ये सारखी भांडणं झाली. दोघेही सेटवर नेहमी भांडत असायचे. ते मेड फॉर इच अदर टाइपचे नव्हते. मला नेहमी वाटायचं की ते एकमेकांसाठीच तयार झालेत पण तसं काही नव्हतं.

करिश्मा आणि अभिषेक यांचं नात खुद्द जया बच्चन यांनाही आवडायचं. एका कार्यक्रमात त्यांनी करिश्मा माझी होणारी सून आहे असं जाहिरही केलं होतं. पण अभिषेक आणि करिश्मा यांच्यात बिनसल ज्याचा जया यांना फार त्रास झाला होता. करिश्मा आणि अभिषेक आता आपापल्या आयुष्यात सुखी आहेत. अभिषेक बच्चन ऐश्वर्याबरोबर तर करिश्मा सध्या सिंगल लाइफ एन्जॉय करतेय.

First published:

Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood actress, Bollywood News