टीआरपीच्या युद्धात आता सतीश राजवाडेची इनिंग

दिग्दर्शक सतीश राजवाडेची सध्या नवी इनिंग सुरू झालीय. स्टार प्रवाहचा प्रोग्रॅमिंग हेड म्हणून त्याची नियुक्ती झालीय. सोनी मराठी वाहिनीवरच्या रिअॅलिटी शोचा तो जजही आहे.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Dec 12, 2018 04:31 PM IST

टीआरपीच्या युद्धात आता सतीश राजवाडेची इनिंग

मुंबई, 12 डिसेंबर : दिग्दर्शक सतीश राजवाडेची सध्या नवी इनिंग सुरू झालीय. स्टार प्रवाहचा प्रोग्रॅमिंग हेड म्हणून त्याची नियुक्ती झालीय. सोनी मराठी वाहिनीवरच्या रिअॅलिटी शोचा तो जजही आहे. सतीशचं अभिनंदन करतानाच दोन प्रतिस्पर्धी वाहिनींवर तो एकाच वेळी काम कसा करतो, याबद्दल विचारलं.


सतीश म्हणाला, ' सोनीवर मी एका शोपुरता जज म्हणून आहे. तर स्टार प्रवाहवरची जबाबदारी वेगळी. दोन्ही भूमिका पूर्ण वेगवेगळ्या. शिवाय मी स्टारला जाॅइन होतोय, तेव्हाच हा रिअॅलिटी शोही संपतोय.'


सतीशला एका वाहिनीला पुढे न्यायचंय. स्पर्धाही खूप आहे. त्याकडे तो कसा पाहतो? ' मला आता तिथे जाऊन हे बदला, ते बदला असं करायचं नाहीय. शिवाय आता ज्या मालिका सुरू आहेत त्या लगेचंच बंद करणं शक्यही नसतं आणि तसं करूही नये. लोक मेहनत करतात. पैशाची गुंतवणूक आहे.'

Loading...


सतीश म्हणतो, हे सगळं माझ्यासाठी नवीन आहे. एका रात्रीत काही बदलणार नाही. बदल हळूहळू होईल. मग तो चांगला की वाईट ते कळेल.


सतीशशी बोलताना म्हटलं, तुझी कट्टर स्पर्धा झी मराठीशी आहे. आणि त्या चॅनेलमध्ये तू कामही केलं आहेस. सध्या मालिकांच्या टीआरपी रेटिंगमध्ये झी मराठीच आघाडीवर आहे. त्यावर तो म्हणाला, ' स्पर्धा तर आहेच. पण ती माणसांशी नाही. कारण सगळेच आपले मित्र आहेत. ज्यांचा कंटेन्ट चांगला, त्याला मार्क मिळतात. अभ्यास चांगला हवा आणि आता कल आहे अभ्यास चांगला करण्यामागे. पहिल्या पाचाच येण्यामागे नाही.'


सतीश जवळ जवळ 19 वर्षांनी नाटकात काम करतोय. नाटकाचं नाव आहे परफेक्ट मर्डर. विजय केंकरे नाटकाचं दिग्दर्शन करतायत. सतीश खूश आहे.'अनेक वर्ष तेच  तेच केल्यानं साचलेपण येतं. आता मी दुसऱ्या दिग्दर्शकाच्या हाताखाली काम करतोय. मी रिफ्रेश होण्यासाठी हे नाटक करतोय.'


सतीशनं दिग्दर्शित केलेला मुंबई पुणे मुंबई 3 हिट चाललाय. कोटींनी कमाई सुरू आहे. सतीश म्हणाला, ' या सिनेमाचा पहिला भाग झाला, तेव्हा अजिबातच कल्पना नव्हती की नंतरचे भाग होतील. पण लोकांनीच प्रश्न विचारले, यांचं पुढे काय झालं? म्हणून दुसरा भाग झाला. तो पहिल्यापेक्षा जास्त हिट झाला. आणि आता लोकांच्या प्रोत्साहनानेच तिसरा भाग बनला.'


सतीश राजवाडे एका वेळी वेगवेगळ्या भूमिका साकारतोय. सृजनशीलतेला मर्यादा नसतात, हेच खरं.
VIDEO : ईशा अंबानीच्या लग्नासाठी सजलं अँटेलिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 12, 2018 04:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...