मुंबई, 08 डिसेंबर :चित्रपट प्रदर्शित होत असताना तो देशातल्या अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा म्हणून कलाकार, डायरेक्टर सध्या वेगवेगळ्या वैचित्र्यपूर्ण गोष्टी करत असतात. सोशल मीडियावर गाजत असलेल्या एखाद्या सीरिजमध्ये काम करणं असो किंवा चाहत्यांच्या ग्रुपशी गप्पा मारणं अशा वेगवेगळ्या गोष्टी कलाकारांकडून केल्या जातात. परंतु दिग्दर्शक राम गोपाल वर्मांनी तर चित्रपट प्रमोशन करत असताना अभिनेत्रीची मुलाखत घेताना वेगळंच कृत्य केलं आहे. त्यांनी आधी अभिनेत्रीच्या पायांना मसाज केला आणि नंतर तिच्या पायाला त्यांनी किस केलं. त्यामुळे प्रेक्षक राम गोपाल वर्मांवर चांगलेच भडकले आहेत. ‘पंजाब केसरी’ने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.
दिग्दर्शक राम गोपाल वर्मा सध्या सोशल मीडियावर टीकेचे धनी ठरत आहेत. त्यांचा ‘डेंजरस’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. ते या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत आहेत. प्रमोशनदरम्यानचा राम गोपाल वर्मा यांचा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आशू रेड्डीसोबतचा एक व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. यात त्यांचं हे आक्षेपार्ह कृत्य पाहून प्रेक्षक त्यांच्यावर प्रचंड टीका करताना दिसून येत आहेत. सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये आशू रेड्डी एका सोफ्यावर बसली आहे. राम गोपाल वर्मा खाली बसून तिच्याशी गप्पा मारत आहेत. व्हिडिओमध्ये बराच वेळ दोघात दीर्घ चर्चा होते. त्यानंतर राम गोपाल वर्मा यांनी आशूच्या पायांचा मसाज करायला सुरुवात केली. काही वेळाने ते तिच्या पायाचं चुंबन घेत असतानाही व्हिडिओत दिसत आहे. राम गोपाल वर्मा यांनी आशूच्या पायांची बोटं चाटल्याचंही व्हिडिओत स्पष्ट दिसतं.
हेही वाचा - 'तु कमी शिकलेला आणि काळा आहेस, मैत्रिणी चेष्टा करतील', नवरीने वराचा केला अपमान अन् कोर्टात प्रकरण पोहोचले
'हा तर प्रसिद्धीचा अतिशय हीन प्रकार'
डेंजरस चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रामगोपाल वर्मांनी केलेला प्रकार अतिशय हीन दर्जाचा असल्याचं प्रेक्षकांनी म्हटलं आहे. अभिनेत्रीच्या पायाला किस करणं म्हणजे महिलांचा अपमान करण्यासारखं आहे अशी टीका त्यांच्यावर केली जात आहे. राम गोपाल वर्मा यांनी दिग्दर्शित केलेला डेंजरस चित्रपट 9 डिसेंबरला रिलीज होणार आहे. यात अप्सरा आणि नैना गांगुली या प्रमुख भूमिकेत असतील. लैंगिकतेवर आधारित असलेल्या या चित्रपटांमध्ये दोन्ही अभिनेत्री लेस्बियनच्या पात्रात दिसतील. लेस्बियन कपल समाजाशी लढून आपलं जीवन आनंदी जगण्याचा कशा प्रकारे प्रयत्न करतात, हे या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे.
— Ramzan Malik 307 (@LIZAMAL97929137) December 7, 2022
नेहमीच वादात अडकतात राम गोपाल वर्मा
दिग्दर्शक असलेल्या रामगोपाल वर्मांनी अनेक हिट चित्रपट दिले आहेत. यात सत्या, भूत, डरना मना है, सरकार, एक हसीना थी, रंगीला अशा अनेक चित्रपटांचा समावेश आहे. परंतु, काही ना काही कारणाने ते नेहमी वादात सापडत असतात. याआधी रामगोपाल वर्मा यांनी अनेक वादग्रस्त विधानं केली आहेत. एकदा तर त्यांनी डॉन दाऊद इब्राहिमचेही आभार मानले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood News, Entertainment, Video viral