दिग्दर्शक प्रविण तरडे यांची मोठी घोषणा, नव्या सिनेमाचं नाव केलं जाहीर

दिग्दर्शक प्रविण तरडे यांची मोठी घोषणा, नव्या सिनेमाचं नाव केलं जाहीर

अभिनेता आणि दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी आपल्या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे.

  • Share this:

मुंबई, 5 जुलै : 'आज मी ज्या चित्रपटाची घोषणा करणार आहे, त्या घोषणेसाठी आजच्यासारखा पवित्र दिवस नसावा', असं म्हणत अभिनेता आणि दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी आपल्या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. प्रविण तरडे हे त्यांच्या लोकप्रिय ठरलेल्या देऊळ बंद या सिनेमाचा सिक्वल बनवणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे,

'देऊळ बंद - 2...आता परीक्षा देवाची' या सिनेमाची प्रविण तरडे यांनी फेसबुक लाईव्ह करत घोषणा केली आहे. यावेळी सिनेमाचे निर्मातेही त्यांच्यासोबत उपस्थित होते. 'देऊळ बंद - 2' ला आज गुरुपौर्णिमेला आपण आता सुरुवात करतोय आणि पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल, असं सिनेमाच्या टीमकडून सांगण्यात आलं आहे.

'गेल्यावेळी स्वामींना शास्त्रज्ञ भेटले होते...यावेळी स्वामींना शेतकरी भेटणार आहे. हा सिनेमाही हिट होईल,' असा विश्वास सिनेमाच्या निर्मात्यांनी व्यक्त केला आहे. तर महाराष्ट्रातील तमाम स्वामीभक्तांच्या आशीर्वादाने हा सिनेमा पुढच्या गुरुपौर्णिमेला म्हणजेच 23 जुलैला महाराष्ट्रासह जगभर प्रदर्शित होईल, असं प्रविण तरडे यांनी म्हटलं आहे.

संकलन, संपादन - अक्षय शितोळे

First published: July 5, 2020, 9:37 PM IST

ताज्या बातम्या