Home /News /entertainment /

इतिहासांत दडलेली महागाथा उलगडणार... येतोय प्रसाद ओकचा नवा ऐतिहासिकपट

इतिहासांत दडलेली महागाथा उलगडणार... येतोय प्रसाद ओकचा नवा ऐतिहासिकपट

मराठा साम्राज्यातील पहिल्या महिला सरसेनापती उमाबाईसाहेब दाभाडे यांच्या शौर्याचा इतिहास या चित्रपटात मांडला जाणार आहे.

  मुंबई 6 जून : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक दिनी काही चित्रपटांच्या घोषणा झाल्या आहेत. त्यातील एक ऐतिहासिक चित्रपट म्हणजे ‘भद्रकाली’ (Bhadrakali). अभिनेता , दिग्दर्शक प्रसाद ओक (Prasad Oak) याने या नव्या ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा केली आहे. (Bhadrakali teaser) मराठा साम्राज्यातील पहिल्या वहिल्या महिला सरसेनापती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या  ‘सरसेनापती उमाबाईसाहेब दाभाडे’ (Sarsenapati Umabaisaheb Dabhade) यांच्या जीवनावर आधारीत हा नवा चित्रपट असणार आहे. सरसेनापती खंडेराव दाभाडे यांनी मराठा साम्राज्याच्या (Maratha empire) सीमा गुजरात पर्यंत वाढवल्या होत्या. तर त्यांच्या पत्नी उमाबाई दाभाडे यांनी हे साम्राज्य राखले. हाच इतिहास या चित्रपटात दाखवला जाणार आहे.
  प्रसाद ओक यांनी चित्रपटाचा टिझर प्रदर्शित करत याची माहिती दिली. त्यांनी पोस्ट शेअर करत लिहीलं आहे, ‘"भद्रकाली"...शिवराज्याभिषेकाने प्रस्थापित झालेले मराठी साम्राज्य सरसेनापती खंडेराव दाभाडे यांनी गुजरात पावेतो भिडवले...ते आपल्या अद्वितीय पराक्रमाने राखणाऱ्या ... मराठा साम्राज्यातील "एकमेव" महिला सेनापती "श्रीमंत सरसेनापती उमाबाईसाहेब खंडेराव दाभाडे"....यांची इतिहासांच्या पानांमध्ये दडलेली महागाथा...’

  महाराष्ट्रात शुटींगला परवानगी; नियमांत शिथिलता आणून चित्रिकरण होणार सुरू

  निर्माते पुनीत बालन (Punit Balan) हे चित्रपटाची निर्मिती करणार असून प्रसिद्ध लेखक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) हे चित्रपटांच लेखन करणार करणार आहेत. व अभिनेता , दिग्दर्शक प्रसाद ओक चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. तर प्रसिद्ध संगितकार अजय- अतुल (Ajay- Atul) हे चित्रपटाला संगीत देणार आहेत. चित्रपटातील कलाकारांची नावं अद्याप गुलदस्त्यात आहेत. पुढील वर्षी म्हणजेच 2022 मध्ये चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तर टिझर पाहून प्रेक्षकांचीही उत्कंठा वाढली आहे. प्रसाद ओक यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या आणखी एका चित्रपटाची म्हणजेच 'चंद्रमुखी' (Chandramukhi) या चित्रपटाचीही घोषणा केली होती. त्यामुळे प्रसाद ओक एकाच वेळी दोन चित्रपटांच दिग्दर्शन करणार आहेत.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Marathi cinema, Marathi entertainment

  पुढील बातम्या