मुंबई 10 जून: भारतातील मोठ्या घोटाळ्यातील फरार आरोपी मेहूल चोक्सी (Mehul Choksi) आता पोलिसांच्या हाती सापडला आहे. कॅरेबियाई (Caribbean) देशात तो डोमिनिका (Dominica) पोलिसांच्या ताब्यात आहे. मे महिन्यात तो अँटीगुआ देशातून फरार झाला होता. त्यानंतर तो डोमिनिकामध्ये सापडला. चोक्सीची गर्लफ्रेंड बारबरा जाबारिका (Barbara Jabarica) ही देखील सध्या चर्चेत आहे. पण आपण चोक्सीची गर्लफ्रेंड नसल्याचं तिने म्हटलं आहे.
मेहूल चोक्सी आणि बारबरा जाबारिकाच्या या कथेवर बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक मधूर भांडारकर (Madhur Bhandarkar) यांना चित्रपट बनवण्याची इच्छा आहे. त्यांना ही कथा हटके वाटत आहे. ट्वीट करत त्यांनी ही इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी लिहीलं आहे, ‘या कथेवर लहान वेबसीरिज किंवा चित्रपट बनू शकतो.’
This story can be made straight into mini series or Film. 😀 https://t.co/9k88Oir2UT
— Madhur Bhandarkar (@imbhandarkar) June 9, 2021
यानंतर भांडारकराच्या अनेक चाहत्यांनी, फॉलोवर्सनी त्यांना प्रतिक्रियाही दिल्या. ‘अनेकांनी म्हटलं की तुम्हीच बनवा’, ‘तर काहींनी म्हटलं लवकरच घोषणा करा.’
नुकतच बारबराने सांगितलं आहे की ती मेहूल चोक्सीची प्रेयसी नाही. ती म्हणाली की, ‘चोक्सी मागील वर्षी मला भेटला होता. व त्याने त्यांच नाव राज असं सांगितलं होतं. ऑगस्ट महिन्यात तो भेटला होता. त्यानंतर आपण मित्र बनलो असही ती म्हणाली.’
Desirable Women होताच रिया चक्रवर्तीचा भाव वधारला? मिळाली थेट दौपदीची भूमिका
पुढे बारबरा म्हणाली की, ‘मागील वर्षीच्या व्हिसीटला आम्ही एकमेकांशी बोललो होतो. त्यानंतर त्याने माझ्याशी फ्लर्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने मला डायमंड रिंग आणि ब्रेसलेट गिफ्ट केलं पण तेही नकली निघालं.’ तिचं म्हणणं आहे की चोक्सीच्या किडनॅपिंगमध्ये तिचा कोणताही हात नाही. व ते दोघे फक्त चांगले मित्र आहेत. चोक्सीने भारतात केलेल्या घोटाळ्यतही तिचा कोणताही हात नाही. ती चोक्सीला भेटली तेव्हा तो एकदम साधा वाट होता व तिने फक्त त्याला चांगला मित्र म्हणून पाहिलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Entertainment