Home /News /entertainment /

‘...निकाल धक्कादायक’, मराठा आरक्षण निर्णयावर दिग्दर्शकाने व्यक्त केला रोष

‘...निकाल धक्कादायक’, मराठा आरक्षण निर्णयावर दिग्दर्शकाने व्यक्त केला रोष

मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रलंबित निर्णय सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आला. केदार शिंदे यांनी याच दिवसभर रंगलेल्या मुद्दयावर भाष्य करत एक ट्वीट केलं आहे.

  मुंबई, 5 मे : नुकताच मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रलंबित निर्णय सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आला. राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात सुचवलेल्या बाबी सुप्रीम कोर्टाने रद्द केल्या. तसंच आरक्षण हे 50 टक्क्यांच्या वर जाऊ शकत नसल्यांचं म्हटलं. यामुळे अनेक थरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी सुप्रीम कोर्टाचा निकाल हा धक्कादायक असल्याचं म्हटलं आहे. केदार शिंदे यांनी याच दिवसभर रंगलेल्या मुद्दयावर भाष्य करत एक ट्वीट केलं आहे. आणि त्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलंय,  ‘आजचा मराठा आरक्षणाबद्दलचा सुप्रीम कोर्टाचा निकाल धक्कादायक! आरक्षण नाही, भाषेला अभिजात दर्जा नाही, मायभूमीत म्हणावा तसा टक्का नाही!!!!’ दिग्दर्शक केदार शिंदे हे त्यांच्या निर्भिड आणि स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहेत. नेहमीच निरनिराळ्या विषयांवर ते मत मांडत असतात. नुकतेच त्यांनी कोरोनाच्या भयंकर संकटात घेतल्या जाणाऱ्या आयपीएल मॅचेस (IPL 2021) आणि राजकीय सभा यावर ताषेरे ओढले होते. आता त्यांनी मराठा आरक्षण आणि मराठी भाषेचा अभिजात दर्जा यावर भाष्य केलं आहे.

  हे वाचा - 'ते स्वस्थ आणि सुरक्षित आहेत', रामायण फेम अरविंद त्रिवेदी आणि गायक लकी अली यांच्या निधनाच्या अफवांवर स्पष्टीकरण

  सुप्रिम कोर्टाने आज मराठा आरक्षणावर अंतरीम निर्णय दिला. यामुळे सध्या राजकीय वर्तुळातही आरोपप्रत्यारोप सुरू आहेत. तर समाजाकडून तीव्र रोष व्यक्त केला जात आहे. हा निर्णय न्यायमूर्ती नागेश्वर राव, अशोक भूषण, एस. अब्दुल नाझीर, हेमंत गुप्ता आणि रवींद्र भट यांच्या खंडपीठाने  दिला आहे. गेली अनेक वर्षे हा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित होता.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Marathi cinema, Marathi entertainment

  पुढील बातम्या