Home /News /entertainment /

‘देवी तिथं जागृत आहे’; दिग्दर्शक केदार शिंदेंनी व्यक्त केली न्यूझीलँडला जाण्याची इच्छा

‘देवी तिथं जागृत आहे’; दिग्दर्शक केदार शिंदेंनी व्यक्त केली न्यूझीलँडला जाण्याची इच्छा

न्यूझीलँडमध्ये गेल्या 100 दिवसात एकही कोरोनाबाधित रुग्ण सापडला नाही...

    मुंबई, 11 ऑगस्ट : भारतात कोरोनाचा कहर वाढत आहे. अद्यापही राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यास सरकारला यश आलेलं नाही. गेल्या 4 महिन्यांपासून कोरोना 'जाईल' या प्रतीक्षेत असलेल्या सर्वांसाठीच हा काळ कठीण आहे. अशातच मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shnide) यांनी न्यूझीलंडला जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. शिंदेंनी यांनी अनोख्या शैलीत ट्विट करीत याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मला न्यूझीलंडला जाऊन राहायचं आहे. कसं शक्य माहिती नाही. या 100 दिवसात तेथे एकही कोरोना बाधित रुग्ण सापडला नाही. महिला पंतप्रधान आहे..देवी तिथे जागृत आहे.. आम्ही येथे फक्त बेटीपढावबेटीजगावचे फतवेच काढणार. त्यांनी या ट्विटमध्ये महिलांना मिळणाऱ्या वागणुकीवरही बोट ठेवलं आहे. गेल्या 100 दिवसांत न्यूझीलंडमध्ये एकही कोरोनाबाधित रुग्ण सापडला नाही. यासाठी त्या देशाच्या पंतप्रधान यांनी लॉकडाऊनचे नियम कडक केले. विशेष म्हणजे त्या दररोज जनतेशी देशातील कोरोना परिस्थितीतीबाबत संवाद साधत होत्या. लोकांना विश्वासत घेऊन त्यांनी कडक लॉकडाऊन यशस्वी केल्याचे सांगितले जात आहे. जेसिंडा अर्डर्न या न्यूझीलँडच्या पंतप्रधान आहे. तरुण वयात त्यांनी हे पद भूषविले आणि ते सार्थ करुन दाखवल, त्यामुळे न्यूझीलँडमध्ये त्यांची खूप चर्चा आहे. गेल्या 100 दिवसात कडक नियमांमुळे येथे कम्युनिटी ट्रान्समिशन झालं नाही. या 100 दिवसात टेस्टिंगवर भर दिला गेला आणि आयसोलेशनचे नियमही पाळण्यात आले. हे वाचा-'बुलाती है मगर...'फेम शायर राहत इंदौरींना कोरोना लागण,चाहत्यांना केली ही विनंती या सर्व बाबींनंतर केदार शिदेंनी तेथे जाण्याची इच्छा व्यक्त केली असावी. त्यांचा अगं बाई..अरेच्चा (2006) हा चित्रपट स्त्रीकेंद्री असून याच्या माध्यमातून एका अनोख्या मात्र खोल अशा विषयात त्यांनी हात घातला आहेत. चित्रपटांपूर्वी केंदार शिंदे यांची अनेक नाटकांनी व्यावसायिक रंगभूमी अक्षरश: गाजवली. अगंबाई अरेच्चा व्यतिरिक्त खोखो, श्रीमंत दामोदर पंत, जत्रा, गलगले निघाले, इरादा पक्का, यंदा कर्तव्य यासांरख्या अनेक चित्रपटांना प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या