'एक बायको सांभाळता आली नाही आणि...', ट्रोलरच्या या ट्वीटवर अनुराग कश्यपचं सडेतोड उत्तर

'एक बायको सांभाळता आली नाही आणि...', ट्रोलरच्या या ट्वीटवर अनुराग कश्यपचं सडेतोड उत्तर

सोशल मीडियावर एका युजरने अनुरागच्या बायकोवरून कमेंट केली आहे. त्या युजरने असे म्हटले होते की- 'एक बायको तर सांभाळता आली नाही आणि निघाला ज्ञान वाटायला.' त्यावर अनुरागने सडेतोड उत्तर दिले आहे.

  • Share this:

मुंबई, 22 जुलै : सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर (Sushant Singh Rajput Suicide) सोशल मीडियावर सुरू झालेल्या नेपोटिझमच्या (Nepotism) वाद आता टोकाला पोहोचला आहे. अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) बॉलिवूडमधील 'मुव्ही माफिया' या मुद्द्याला घेऊन अनेकांवर टीका केली आहे. त्यामुळे तिला कुणाकडून तरी प्रत्युत्तर मिळणार हे साहजिकच होते. दरम्यान अभिनेत्री तापसी पन्नू, स्वरा भास्कर यांनी तिचे जुने व्हिडीओ शेअर करत तिच्यावर पलटवार केला आहे.

तर दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) याने देखील काही ट्वीट करून कंगनावर टीका केली होती. 'या नवीन कंगनाला मी ओळखत नाही', असं देखील ट्वीट त्याने केले होते. त्याचबरोबर ट्विटरवर अनुराग कश्यप आणि अभिनेता रणवीर शौरी (Ranvir Shorey) यांच्यामध्ये देखील ट्वीटवॉर पाहायला मिळाले. त्यावर अनुरागचा स्टँड अनेकांना रुचला नाही, त्यामुळे काही ट्रोलर्सनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान त्याच्या सडेतोड स्वभावासाठी प्रसिद्ध असणारा अनुरागने यावेळीही एका ट्रोलरला चोख उत्तर दिले आहे.

(हे वाचा-इनडोअर फोटोंमध्येही सुहानाच्या ग्लॅमरस अदा, चाहत्यांना बॉलिवूड पदार्पणाची प्रतीक)

सोशल मीडियावर एका युजरने अनुरागच्या बायकोवरून कमेंट केली आहे. त्या युजरने असे म्हटले होते की- 'एक बायको तर सांभाळता आली नाही आणि निघाला ज्ञान वाटायला.' यावर उत्तर देताना अनुरागने अत्यंत कमाल उत्तर दिले आहे आणि त्या ट्रोलरला गप्प केले आहे.

अनुरागने असे म्हटले आहे की, 'बायकांना सांभाळावं लागत नाही, त्या स्वत:ला, तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला सांभाळू शकतात. आमचं पटलं नाही तेव्हा ती निघून गेली. गुलाम नव्हती की मी तिला बांधून ठेवेन. बाकी तुमचं सर्व ठीक चाललं आहे ना?'

अनुरागचे हे ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनुराग कश्यपने जेव्हा पासून कंगनाबाबत ट्वीट केले आहेत, तेव्हापासून त्याला ट्रोलिंगची शिकार व्हावं लागत आहे. त्याने असे म्हटले होते की, ती आधी त्याची चांगली मैत्रिण होती, पण आता या नवीन कंगनाला मी ओळखत नाही. कंगनाने अनुरागला मिनी महेश भट्ट संबोधले आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: July 22, 2020, 2:51 PM IST
Tags:

ताज्या बातम्या