ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद यांच्यावर येणार बायोपिक; लवकरच शूटिंगला सुरुवात

ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद यांच्यावर येणार बायोपिक; लवकरच शूटिंगला सुरुवात

विश्वनाथन आनंद (Vishwanathan Anand) यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट येऊ घातलाय. यानिमित्ताने विश्वनाथन आनंदचा यांचा बालपणपासून चेस मास्टर होण्यापर्यंतच्या कारकिर्दीचा प्रवास मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

  • Share this:

मुंबई, 13 डिसेंबर: आजाकाल बायोपिकचा ट्रेंड आहे. अनेक कलाकार, राजकारणी आणि क्रीडा विश्वातील लोकांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट आजवर आले आहेत. अशा प्रकारच्या चित्रपटांमुळे आपलं मनोरंजन होतंच पण खूप काही शिकायलाही मिळतं. त्यामुळे बायोपिकला प्रेक्षकांचीही पसंती मिळते. अलीकडच्या काळात एमएस धोनी, एमसी मेरी कॉम, संदीप सिंग आणि मिल्खा सिंग यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट प्रदर्शित झाले होते. आता चेस मास्टर विश्वनाथन आनंद यांच्या जीवनावर आधारित सिनेमा लवकरच येणार आहे. विश्वनाथन आनंद  (Vishwanathan Anand) यांनी बर्‍याच काळापासून बुद्धिबळाच्या जगात भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे.

आतापर्यंत 5 वेळा विश्वविजेतेपद जिंकलेल्या विश्वनाथन आनंद यांनीही बायोपिक बनवण्यास सहमती दर्शविली आहे. आनंद एल राय या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. आनंद एल राय यांनी यापूर्वी 'तनु वेड्स मनु', 'रझाना' आणि 'झिरो' असे चित्रपट केले आहेत. सध्या ते अक्षय कुमार, सारा अली खान आणि धनुष यांच्यासमवेत ‘अतरंगी रे’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे.

यापूर्वी विश्वनाथन आनंद यांना बायोपिकसाठी अनेक ऑफर्स मिळाल्या होत्या, परंतु त्यांनी नकार दिला होता. परंतु यावेळी त्यांनी संमती दिली आहे. या चित्रपटासाठी अद्याप कलाकार आणि क्रू निश्चित झाले नाहीत, परंतु लवकरच या बायोपिकविषयी सर्व घोषणा केल्या जातील अशी माहिती मिळत आहे.

सिनेमाच्या शूटिंगच्या नाव अद्यापही समजलेलं नाही. येत्या 6 महिन्यात या चित्रपटाचं शूटिंग सुरू होणार आहे. विश्वनाथन आनंदचा बालपणपासून चेस मास्टर होण्यापर्यंतच्या कारकीर्दीचा प्रवास या चित्रपटात दाखविण्यात येणार आहे. या सिनेमात मुख्य भूमिका साकारण्यासाठी कोणत्या कलाकारांची निवड केली जाईल हे आता पाहावे लागेल.

Published by: Amruta Abhyankar
First published: December 13, 2020, 7:05 PM IST
Tags:

ताज्या बातम्या