Home /News /entertainment /

'का संगतीचं सुख खुनावत राही गं....' दिग्दर्शक प्रसाद ओक कुणाच्या आठवणीत झाला भावुक?

'का संगतीचं सुख खुनावत राही गं....' दिग्दर्शक प्रसाद ओक कुणाच्या आठवणीत झाला भावुक?

'का संगतीचं सुख खुनावत राही गं....' दिग्दर्शक प्रसाद ओक कुणाच्या आठवणीत झाला भावुक?

'का संगतीचं सुख खुनावत राही गं....' दिग्दर्शक प्रसाद ओक कुणाच्या आठवणीत झाला भावुक?

एकीकडे अभिनय आणि दिग्दर्शनाची धुरा प्रसाद ओकनं अगदी उत्तमरित्या निभावली. प्रत्येकाकडून प्रसादला शाबासकीची आणि कौतुकाची थाप मिळत आहे. असं असतानाही प्रसाद मात्र भावूक झाल्याचं पाहायला मिळतय.

  मुंबई, 09 जून:  अभिनेता दिग्दर्शक प्रसाद ओक (Prasad Oak) सध्या सर्वांचा लाडका अभिनेता आणि दिग्दर्शक बनला आहे. एकीकडे चंद्रमुखी (Chandramukhi) सारखा सिनेमा स्वत:चा प्रसादच्या दिग्दर्शनाखाली तयार झाला तर दुसरीकडे धर्मवीर (Dharmaveer) या तितक्याच तगड्या सिनेमात प्रसादनं मुख्य भूमिका साकारली. एकीकडे अभिनय आणि दिग्दर्शनाची धुरा प्रसादने अगदी उत्तमरित्या निभावली. प्रत्येकाकडून प्रसादला शाबासकीची आणि कौतुकाची थाप मिळत आहे.  असं असतानाही प्रसाद मात्र भावूक झाल्याचं पाहायला मिळतय. प्रसाद सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो नुकतीच त्यानं एक भावूक पोस्ट करत आठवणींना उजाळा दिलाय. चंद्रमुखी सिनेमा हा प्रसादच्या आयुष्यातील महत्त्वाचा सिनेमा होता. अनेक आव्हानांचा सामना करत प्रसादनं हा सिनेमा प्रेक्षकांपर्यंत आणला. त्याच्या आतापर्यंतच्या सिनेसृष्टीतील त्याचा दिग्दर्शक म्हणून नव्या प्रवास या सिनेमाच्या माध्यमातून सुरू झाला. चंद्रमुखी सिनेमाच्या पडद्यामागील शुटींगच्या आठवणी प्रसादनं शेअर केल्या आहेत. सिनेमातील 'कान्हा' ( Kanha)  हे फार सुंदर आणि भावूक गाण्यावरचा एक शॉर्ट व्हिडीओ प्रसादनं शेअर केला आहे.
  'का संगतीचं सुख खुनावत राही रं... का बिलगून मन रितं रितं राही रं... "चंद्रमुखी" चे शूटिंग चे दिवस,  असं कॅप्शन देत प्रसादनं व्हिडीओ शेअर केला आहे. प्रसादसाठी चंद्रमुखी हा सिनेमा किती महत्त्वाचा आणि जवळचा होता हे या व्हिडीओमधून पाहायला मिळत आहे. सिनेमासाठी प्रसादनं घेतलेली मेहनत या व्हिडीओतून पाहायला मिळत आहे. हेही वाचा - समीरवर चढणार यश नेहाच्या हळदीच्या रंग; दारुच्या नशेत शेफालीला करणार प्रपोज प्रसादच्या व्हिडीओमधील कान्हा या गाण्यानं फारचं सुंदर आहे. गाण्याविषयी बोलायचं झालं तर हे गाणं लेखक गुरू ठाकूर (Guru Thakur) यांनी लिहिलं आहे. तर अजय -अतुल (Ajay Atul) यांचं सुंदर म्युझिक गाण्याला आहे. तसंच अजय गोगावलेचा दमदार आवाज गाण्याला लाभला आहे. सिनेमातही हे गाणं ज्या ट्रॅकला दाखवण्यात आलं आहे तो सीन ही प्रेक्षकांना चांगलाच भावला आहे. चंद्रा, दौलतराव आणि डॉली यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या वळणावर हे गाणं घेण्यात आलं आहे. प्रसादनं या आधीही चंद्रमुखी सिनेमाच्या काही आठवणी त्याच्या चाहत्यांबरोबर शेअर केल्या होत्या. प्रसाद सध्या धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. महाराष्ट्रात सिनेमाने चांगली कमाई केली. सिनेमा आता विदेशातही प्रदर्शित होणार आहे. प्रसादचे चंद्रमुखी आणि धर्मवीर या दोन्ही सिनेमांनी बॉक्स ऑफसवर चांगली कमाई केली.
  Published by:Minal Gurav
  First published:

  Tags: Marathi actress, Marathi cinema, Marathi entertainment, Zee Marathi

  पुढील बातम्या