• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • VIDEO: जवळचा मित्र गमवताच 'ससुराल सिमर का' फेम Dipika Kakar ला अश्रु अनावर

VIDEO: जवळचा मित्र गमवताच 'ससुराल सिमर का' फेम Dipika Kakar ला अश्रु अनावर

Dipika Kakar

Dipika Kakar

'ससुराल सिमर का' फेम अभिनेत्री दीपिका कक्कडने (Dipika Kakar ) तिचा जवळचा मित्र गमवला आहे.

 • Share this:
  मुंबई, 22 नोव्हेंबर: 'ससुराल सिमर का' फेम अभिनेत्री दीपिका कक्कड (Dipika Kakar ) तिच्या लग्नानंतर अभिनय क्षेत्रापासून दूर आहे. मात्र ती सोशल मीडियाद्वारे चाहत्यांशी संपर्कात असते. दीपिका तिचे वैवाहिक जीवन एन्जॉय करताना नेहमी दिसते. अशातच तिने आपला रडतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तिने आपण जवळचा मित्र गमवला असल्याचे स्पष्ट केले आहे. प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेता शोएब इब्राहिम आणि दीपिका कक्कड यांच्या घरी शोकचे वातावरण निर्माण झाले आहे. दीपिका स्वतः खूप दुःखी आहे. ती स्वतःला सावरु शकत नाहीय. कारण कुटुंबातील एक लाडका सदस्य त्यांना सोडून गेल आहे. दीपिका आणि शोएबने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर करून त्या सदस्याचे महत्त्व सांगितलं आहे. शोएब इब्राहिमने त्याच्या यूट्यूबवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दीपिकाने तिच्या घरातील सर्वात प्रिय सदस्य 'कडल' यांचं निधन झाले आहे. कडल हे त्यांच्या 'कुत्र्या'चं नाव आहे. या कपलने आपल्या कुत्र्याला आपल्या कुटुंबातील सदस्य मानले होते. दीपिकाने तिच्या भावना चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत. दीपिका रडत रडत म्हणाली, 'कडल आता राहिलेला नाही. बरेच दिवस त्यांची तब्येत ठीक नव्हती. त्याला दमा होता आणि त्याला कॅन्सरही झाला होता. त्याच्यावर उपचार सुरू होते, पण उपचार पूर्ण झाले नाहीत. आम्ही त्याला मुंबईतील उत्तम डॉक्टरांकडे नेले. गेल्या दोन आठवड्यांपासून त्याची प्रकृती थोडी बिघडली होती, पण तो खेळत होता. गेल्या दोन दिवसांपासून त्यांना खूप वेदना होत होत्या. मी त्याला डॉक्टरांकडे नेले, तिथे त्याला नेब्युलायझर वगैरे दिले. काल रात्री तो आमच्यासोबत खूप शांत झोपला.' त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा कडलची प्रकृती बिघडल्याने तिने त्याला डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांनी त्याला सांगितले की आता तो बरा होऊ शकत नाही. यानंतर शोएब मुंबईतील पाळीव प्राण्यांच्या रुग्णालयाबद्दल बोलताना दिसला आणि तो म्हणाला की, यावेळी मला त्याबद्दल बोलायचे नाही. तेव्हा दीपिकाने सांगितले की, ती त्या हॉस्पिटलचे सत्य सांगेन की पेट झोनमध्ये तिच्यासोबत जे घडले ते कोणाच्याही बाबतीत घडू नये. असे म्हटले आहे.
  Published by:Dhanshri Otari
  First published: