ढिंच्याक पूजा बिग बॉसमध्ये?

बिग बॉसच्या प्रॉडक्शन हाउसने अर्थात 'एंडमॉल प्रॉडक्शन्स'ने ढिंच्याक पूजाला बिग बॉसमध्ये भाग घेण्यासाठी विचारणा केली होती.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jul 13, 2017 01:17 PM IST

ढिंच्याक पूजा बिग बॉसमध्ये?

13 जुलै: सोशल मीडियावरचं  व्हायरल सेन्सेशन म्हणजे ढिंच्याक पूजा. तिच्या गाण्यांमुळे पूजा जितकी लोकप्रिय झाली तितकीच वादग्रस्तही ठरली. आता हीच  ढिंच्याक पूजा बिग बॉसमध्ये एन्ट्री करणार आहे.

सध्या बिग बॉस 11 साठी  पार्टिसिपंट्सचा शोध चालू आहे. त्यातच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बिग बॉसच्या प्रॉडक्शन हाउसने अर्थात 'एंडमॉल प्रॉडक्शन्स'ने ढिंच्याक पूजाला बिग बॉसमध्ये भाग घेण्यासाठी विचारणा केली होती. पूजानं होकार दिल्यावर तिला बिग बॉससाठी फायनलाइज करण्यात आलं अशी सध्या  चर्चा आहे. तिच्यासोबतच छोट्या पडद्यवरच्या मयुर वर्मालाही शोसाठी सिलेक्ट केल्याचं बोललं जातंय.

पूजा तिच्या गाण्यांमुळे कायम चर्चेत असते. नुकतंच तिच्या एका गाण्यामुळे तिच्यावर पोलिसांनी कारवाईही केली होती. एक दोन दिवसांपूर्वी पूजाने तिच्या गाण्यांचे व्हिडिओही डिलिट केले होते. आता बिग बॉसमध्ये पूजा काय धुमाकूळ घालते हे येणारा काळच ठरवेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 13, 2017 01:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...