DDLJ आणि मराठा मंदिर हे समीकरण आजही ठरतंय Houseful! कोरोना काळातही प्रेक्षकांची गर्दी

'दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे' या 1995 मध्ये प्रदर्शित झालेल्या सिनेमानं प्रेक्षकांची मनं जिंकली होती. विशेष बाब म्हणजे चित्रपटाच्या प्रदर्शनाला 25 वर्ष पूर्ण होऊनही अजूनही हा सिनेमा मुंबईतील एका चित्रपटगृहात प्रेक्षकांना पाहाता येतो.

'दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे' या 1995 मध्ये प्रदर्शित झालेल्या सिनेमानं प्रेक्षकांची मनं जिंकली होती. विशेष बाब म्हणजे चित्रपटाच्या प्रदर्शनाला 25 वर्ष पूर्ण होऊनही अजूनही हा सिनेमा मुंबईतील एका चित्रपटगृहात प्रेक्षकांना पाहाता येतो.

  • Share this:
    मुंबई 28 जानेवारी : 'दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे' (DDLJ) या 1995 मध्ये प्रदर्शित झालेल्या सिनेमानं प्रेक्षकांची मनावर अधिराज्य केलं. या सिनेमानं फक्त प्रेक्षकांची मनंच जिंकली नाहीत, तर बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाईदेखील केली. विशेष बाब म्हणजे चित्रपटाच्या प्रदर्शनाला 25 वर्ष पूर्ण होऊनही अजूनही हा सिनेमा मुंबईतील एका चित्रपटगृहात (theater) प्रेक्षकांना पाहाता येतो. या सिनेमागृहाचं नाव आहे, मराठा मंदिर (Maratha Mandir). खरं तर शाहरुख (Shahrukh Khan) आणि काजोलच्या (Kajol) याच सिनेमानं या चित्रपटगृहाचं नाव सतत चर्चेत असतं. मराठा मंदीर आणि डीडीएलजे हे एक समीकरणच आहे. बॉलिवूडच्या गाजलेल्या चित्रपटांच्या यादीत आदित्य चोप्रा यांच्या या सिनेमाचं नाव नेहमीच घेतलं जातं. मात्र, गेल्या 25 वर्षांपासून मराठा मंदिरात सुरू असणारा या सिनेमाचा शो कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यान काही काळासाठी बंद होता. मात्र, नोव्हेंबर 2020 पासून हा सिनेमा पुन्हा एकदा सुरू करण्यात आला आहे. राज्यात सरकारने सिनेमागृहात बसण्यासाठीची क्षमता 50 टक्क्यांवर आणली आहे. कोरोनाच्या भितीमुळे अजूनही अनेक सिनेमागृहे ओसाड पडलेली असतानाच मराठा मंदिरातील 'DDLJ' मात्र आपल्या प्रेक्षकांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरला आहे. (हे वाचा-अभिनेत्रीने केलं बॉडीगार्डशीच लग्न; चौथ्यांदा बांधली लग्नगाठ) सध्या सकाळी 11.30 वाजताच एक शो याठिकाणी दाखवला जात आहे आणि तो पाहण्यासाठी जवळपास 200 ते 300 लोक येत असल्याची माहिती सिनेमागृहाच्या मालकांनी दिली आहे. ते म्हणाले, की मराठा मंदिरमध्ये चालवल्या जाणाऱ्या इतर चित्रपटांना पाहाण्यासाठी सध्या प्रेक्षक येत नाही. अशात 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' हा एकच सिनेमा पाहाण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी होत आहे. तसंच विजय थलपतिच्या मास्टर या सिनेमाच्या प्रदर्शनानंतर कमाईत आणखी काही प्रमाणात सुधारणा झाली असल्याचंही त्यांनी सांगितलं.
    Published by:Kiran Pharate
    First published: