20 ऑक्टोबर 1995 मध्ये ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटाने सर्वच रेकॉर्ड मोडीत काढले होते. या चित्रपटाने शाहरुख खान, काजोल ते मंदिरा बेदी अशा सर्वच कलाकरांना यशाच्या शिखरावर पोहोचवलं होतं. राज आणि सिमरनच्या लव्हस्टोरीने आजही प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातलं आहे. आजची पिढीसुद्धा हा चित्रपट तितक्याच उत्सुकतेने पाहते. चित्रपटातील प्रत्येक गाणं सुपरडुपर हिट झालं होतं. आजही ही गाणी एव्हरग्रीन आहेत. ती आजसुद्धा आजचं रिलीज झाल्यासारखी ऐकली जातात. इतकचं नव्हे तर मुंबईच्या मराठा मंदिर चित्रपटगृहात 2015 पर्यंत या चित्रपटाचा दररोज एक खेळ दाखविण्यात येत होता. (हे वाचा: आलियाने 'Darlings'चं शुटींग केलं पूर्ण; शेयर केला खास VIDEO) या चित्रपटा शाहरुख खानने एक सुंदर असं लेदर जॅकेट घातलं आहे. चित्रपटानंतर अशा जॅकेटची मोठी क्रेझसुद्धा पाहायला मिळाली होती. मात्र हा जॅकेट खास चित्रपटासाठी घेण्यात आलेला नव्हता. हा जॅकेट चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य चोप्रा यांचा भाऊ आणि चित्रपटाचे निर्माता यश चोप्रा यांचा लहान मुलगा अभिनेता उदय चोप्राचा हा जॅकेट होता. शाहरुखने उदयचा जॅकेट घातला होता. उदयने कॅलिफोर्नियाच्या बेकर्सफिल्डमधील हार्ले डेव्हिडसनच्या शोरूममधून ते 400 डॉलर्सला खरेदी केलं होतं. हेच जॅकेट घालून शाहरुखने तरुणींच्या मनात प्रवेश केला होता.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood News, Shahrukh khan