मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

इंग्रजी येत नाही म्हणून मुलाखत न देता परत आला होता 'हा' अभिनेता ; आज आहे सुपरस्टार

इंग्रजी येत नाही म्हणून मुलाखत न देता परत आला होता 'हा' अभिनेता ; आज आहे सुपरस्टार

दिलजीत दोसांझ हा आपल्या अभिनयासाठी आणि गाण्यासाठी प्रसिद्ध आहे. पण ह्या प्रसिद्ध अभिनेत्याने एकदा इंग्रजी येत नसल्यामुळे चक्क एक मुलाखत सोडून दिली होती हे किती लोकांना ठाऊक आहे?

दिलजीत दोसांझ हा आपल्या अभिनयासाठी आणि गाण्यासाठी प्रसिद्ध आहे. पण ह्या प्रसिद्ध अभिनेत्याने एकदा इंग्रजी येत नसल्यामुळे चक्क एक मुलाखत सोडून दिली होती हे किती लोकांना ठाऊक आहे?

दिलजीत दोसांझ हा आपल्या अभिनयासाठी आणि गाण्यासाठी प्रसिद्ध आहे. पण ह्या प्रसिद्ध अभिनेत्याने एकदा इंग्रजी येत नसल्यामुळे चक्क एक मुलाखत सोडून दिली होती हे किती लोकांना ठाऊक आहे?

नवी दिल्ली, 21 जानेवारी: पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांज आपल्या देसी अभिनयासाठी प्रसिद्ध आहे.  पंजाबी चित्रपटच नव्हे तर खूपच कमी वेळात त्याने बॉलीवूडमध्येही आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याची सर्व गाणी ही नेहमीच हिट ठरतात तर त्याच्या अभिनयाचं देखील खूप कौतुक होत असतं. पण ऐकून नवल वाटेल की इंग्रजी बोलता येत नसल्याने एकदा दिलजीतने Vogue मॅगझिनला मुलाखत द्यायला नकार कळवला होता.

पंजाबी इंडस्ट्रीमधून बॉलीवूड मध्ये आल्यावर आपल्या अभिनयाच्या जोरावर लवकरच दिलजीतने बॉलीवूड मध्ये देखील आपली छाप सोडली. आता दिलजीत बॉलीवूड चित्रपट करत असला तरीदेखील त्याला अजुनही पंजाबी भाषाच जास्त आवडते. इंग्रजी शिकण्यावर किंवा बोलण्यावर तो अजुनही जास्त भर देताना दिसत नाही. एकदा तर त्याने फक्त इंग्रजी येत नाही म्हणुन Vogue मैगजीनला मुलाखत द्यायला नकार दिल होता. 2019 मध्ये दिलजीत Vogue मॅगझीनच्या कव्हर पेज वर झळकला होता. आतापर्यंत करीना कपूर, करण जौहर आणि  नताशा पुनावाला यांना देखील Vogue मॅगझीनच्या कवर पेज वर स्थान मिळालेलं आहे. बीबीसी एशियन नेटवर्कशी बोलताना दिलजितने सांगितले की, ' प्रत्येकात काही उणीवा असतात. माझं इंग्रजी वाईट होतं आणि याच कारणामुळे  मी मुलाखतीपासून दूर राहण्याचं ठरविलं होतं.  हे खरं आहे की एक इंग्रजी-मॅडम Vogue मॅगझिनसाठी  माझी मुलाखत घेऊ इच्छित होत्या . माझे फोटो काढण्यासाठी त्यांनी मला कॉल करून विशेषतः लंडनला बोलावून घेतलं. मी विमानात बसलो होतो तेव्हासुद्धा मला खूप आनंद झाला होता. दिलजीत दोसांझ फोटो काढल्याची घटना आठवत पुढे सांगतात की  त्यानंतर जेह्वा त्या  मॅडमने सांगितले की तुमची मुलाखत घेतली जाईल तेह्वा मात्र मी तिथून निघून आलो. हे देखील वाचा - Kangna VS Diljit 2.0: कंगनाने पुन्हा काढली खोड, दिलजीतने असं उत्तर दिलं की... दिलजीत दोसांझ ने इंग्रेजी बद्दल आपला अनुभव सांगताना म्हटलं की,' मला जर कोणी हिंग्लीश चित्रपट करायला दिला तर मी लगेच नकार देईल पण पंजाबी  चित्रपट करताना मात्र मी कोणताही सीन माझ्या पद्धतीने करण्याच्या परिस्थितीत असतो.हिंदीचा माझा शब्दकोष सुद्धा कमी आहे त्यामुळे मला हिंदीत सुद्धा भरपूर त्रास होतो. म्हणूनच मी जास्तीत जास्त हिंदी चित्रपट पाहण्याचा प्रयत्न करतो आणि जेवढे डायलॉग मला मिळतील तेवढेच बोलण्याचा प्रयत्न करतो. दिलजीत आपली इंग्रजी आणि हिंदी सुधारवण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय.अलीकडे दिलजित दोसांझ 'सूरज पे मंगल भारती' चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत मनोज बाजपेयी आणि फातिमा सना शेख देखील होते. या चित्रपटाचे खूप कौतुक झाले आहे. खासकरुन दिलजित दोसांझची कॉमिक टाइमिंग प्रेक्षकांनी चांगलीच पसंत केली आहे.
First published:

Tags: Bollywood, Singer

पुढील बातम्या