निलेश साबळेचे 'श्रीयुत टिपरे' आणि श्रेयाची 'श्यामल' येतायत हसवायला

निलेश साबळेचे 'श्रीयुत टिपरे' आणि श्रेयाची 'श्यामल' येतायत हसवायला

येत्या भागात थुकरटवाडीत झी मराठी प्रस्तुत नटसम्राट आणि आरण्यक या नाटकातील कलाकारांची फौज सज्ज होणार आहे.

  • Share this:

मुंबई, 20 नोव्हेंबर : कसे आहात मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे, असं म्हणत गेली चार वर्षे झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र तसंच जगभरातील मराठी प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. प्रेक्षकांचं प्रेम आणि उत्तम प्रतिसादाने 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाने ४०० भागांचा यशस्वी पल्ला गाठला. हा शो नेहमीच टीआरपी रेटिंगमध्ये पहिल्या पाचमध्ये राहिलाय.

'चला हवा येऊ द्या' हा संपूर्ण आठवडा प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणार आहे. येत्या भागात थुकरटवाडीत झी मराठी प्रस्तुत नटसम्राट आणि आरण्यक या नाटकातील कलाकारांची फौज सज्ज होणार आहे. मोहन जोशी, रोहिणी हट्टंगडी, दिलीप प्रभावळकर यासारखे ज्येष्ठ कलाकार थुकरटवाडीत हजर असल्यावर त्यांच्या आणि प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी 'चला हवा हवा येऊ द्या'मधील विनोदवीर दमदार स्किट सादर करणार यात शंकाच नाही.

VIDEO : सलमान-कतरिना चालत चालत जातायत तरी कुठे?

'हा' अभिनेता आहे सई ताम्हणकरचा नवा बॉयफ्रेंड

भाऊ कदम ठरणार का पुन्हा एकदा 'नशीबवान'?

रोहिणी हट्टंगडी यांनी मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटात संजय दत्तची आई साकारली होती. म्हणून थुकरट वाडीचा मुन्ना भाऊ एमबीबीएस विनोदवीरांनी सादर केला. यात भाऊ कदम मुन्ना भाऊ साकारणार आहे. तसंच श्रीयुत गंगाधर टिपरे ही अजरामर मालिका आज ही प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य उमटवते. खुद्द दिलीप प्रभावळकर थुकरट वाडीत असल्यावर त्यांच्यासमोर विनोदवीरांनी आबा टिपरे साकारले. निलेश साबळे यांनी आबा टिपरे तर श्रेया बुगडेने श्यामल साकारली.

हे सर्व विनोदवीर त्यांच्या अभिनय कौशल्याने आणि कॉमेडी टायमिंगने सर्व रसिक प्रेक्षकांना हसून लोटपोट करण्यासाठी संपूर्ण आठवडा सज्ज होणार आहेत. आत्तापर्यंतच्या प्रवासात 'चला हवा येऊ द्या'मध्ये प्रेक्षकांनी महाराष्ट्र दौरा, भारत दौरा आणि विश्व दौरा यांचा मनमुराद आनंद लुटला. ४०० भागांनंतर आता या कार्यक्रमात नवीन काय असा प्रश्न सर्वांसमोर उपस्थित झाला असताना नुकतंच 'चला हवा येऊ द्या'चं नवीन पर्व 'होऊ दे व्हायरल' प्रेक्षकांच्या भेटीस आलं.

First published: November 20, 2018, 12:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading