दिलीप कुमार यांचं पेशावरमधलं घर कोसळलं

दिलीप कुमार यांचं पेशावरमधलं घर कोसळलं

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं पाकिस्तानातील पेशावरमधलं जुनं घर आता कोसळलंय.

  • Share this:

17 जून : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं पाकिस्तानातील पेशावरमधलं जुनं घर आता कोसळलंय.

क्विस्सा खवानी बाजाराजवळील मोहल्ला खुदादाद भागात असलेलं दिलीप कुमार यांचं वडिलोपार्जित घर मोडकळीस आलं होतं. हे घर पाकिस्तानी सरकारने जतन करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र कालांतराने ते जीर्ण होऊन पडायला लागलं. आता तर फक्त या घराचा पुढचा भाग आणि दरवाजा शाबूत आहे.

याबाबत पाक सरकारकडे वारंवार अर्ज करूनही त्याबाबत पाक सरकारने कोणतीही दखल घेतली नाही. आता मोडकळीस आलेल्या या जुन्या घराची प्रतिकृती उभारण्यात येईल अशी चर्चा आहे.

First published: June 17, 2017, 9:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading