मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

मोठी अपडेट: दिलीप कुमार यांची प्रकृती गंभीर

मोठी अपडेट: दिलीप कुमार यांची प्रकृती गंभीर

दिलीप कुमार यांचे फॅमिली डॉक्टर जलील पारकर यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या फुफ्फुसात पाणी साचलं आहे.

    मुंबई, 06 जूनः बॉलिवूडचे ज्येष्ठ नेते दिलीप कुमार (Veteran actor Dilip Kumar) यांची प्रकृती संदर्भातली मोठी अपडेट समोर आली आहे. दिलीप कुमार यांना आज सकाळी खार येथील हिंदुजा (PD Hinduja Hospital) रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत. त्यांना सध्या ICU मध्ये ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आलं आहे. दिलीप कुमार यांचे फॅमिली डॉक्टर जलील पारकर यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या फुफ्फुसात पाणी साचलं आहे. त्यामुळं एवढ्या लवकर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्च मिळणं अवघड आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनानं त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दिलीप कुमार यांच्या चाहत्यांनी काळजी करु नये लवकरच ते घरी परततील असं आश्वासनही डॉक्टरांनी दिलं आहे. दिलीप कुमारांच्या भेटीला रुग्णालयात पोहोचले शरद पवार, पाहा VIRAL PHOTO आज सकाळी 8.30 वाजता त्यांना रुग्णालयात आणण्यात आलं होतं. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दिलीप कुमार यांच्या शरीरात हिमोग्लोबिनचं कमतरता आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून दर महिन्याला त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येतं.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Bollywood, Bollywood actor

    पुढील बातम्या