मुंबई, 25 मार्च : चमचमणाऱ्या बॉलिवूडच्या दुनियेत कलाकारांमध्ये भांडणं होणं काही नवीन नाही. असे अनेक कलाकार आहेत ज्यांच्यात वैयक्तिक वाद आहेत. ते कधीच एकमेकांचं तोंड देखील पाहायला तयार नसतात. बॉलिवूडचे ट्रॅजिडी किंग आणि राज कपूर यांच्यात देखील असंच नातं होतं. दोघांनी एकेकाळी पैगाम सारख्या सिनेमात एकत्र काम केलं होतं. पण त्यानंतर दोघांनी धरलेला अबोला हा पुढची 30 वर्ष कायम राहिला. दोघांनी एकमेकांबरोबर काम न करण्याची शपथ घेतली होती. पण 30 वर्षांनी दोघांनी एकत्र काम केलं आणि तो सिनेमा सुपरहिट ठरला. हाच किस्सा आज आपण पाहणार आहोत.
1991मध्ये आलेल्या सौदागर सिनेमात दिलीप कुमार आणि राज कुमार यांनी एकत्र काम केलं. या दोघांना एकत्र आणण्यासाठी दिग्दर्शक सुभाष घई यांना प्रचंड कष्ट सहन करावे लागले होते. दोघांना एकत्र एका सिनेमात आणणं हे त्यांच्यासाठी अग्नी दिव्यापेक्षा कमी नव्हतं. 'सौदागर' सिनेमात दिलीप कुमार, राज कुमार यांच्यासह अभिनेत्री मनीषा कोईराला देखील होती.
हेही वाचा - बॉलिवूड सिनेमांची कथा 'या' 5 मालिकांनी केल्या कॉपी; कोणी मारली TRPमध्ये बाजी तर कोणी झालं सुपर फ्लॉप
सौदागर सिनेमातून दिलीप कुमार आणि राज कुमार यांनी एकत्र काम करण्यास सुरूवात केली. दोघांनी आपल्या अभिनयानं आणि स्टाइलनं सिनेमातून प्रेक्षकांची मनं जिंकली. सिनेमाची कथा आणि गाण्यांनी चांगलीच धम्माल आणली. पण दोघांनी सिनेमात कास्ट करण्यासाठी सुभाष घईंना चांगलेच पापड लाटावे लागले होते. दोघांमधील जुनी दुष्मनी काही संपण्याचं नाव घेतल नव्हती.
सिनेमाच्या सेटवर गेल्यानंतर राज कुमार यांना कळलं की दिलीप कुमार युपी आणि बिहारच्या टोनमध्ये बोलतात. त्यांना ही गोष्ट अजिबात आवडली नाही. सिनेमात त्यांना नॉर्मल हिंदी बोलायचं होतं. त्यांच्या या गोष्टीवर नाराज होऊन राजकुमार यांनी सुभाष घईंकडे तक्रार केली. त्यानंतर राज कुमारला मनवण्यासाठी सुभाष घईंना 2 तास लागले होते. त्यांनी त्यांना सांगितलं की, सिनेमात राज कुमार श्रीमंत व्यक्तीची भूमिका करत आहेत तर दिलीप कुमार गरीब व्यक्तीचा. त्यांच्या या वाक्यानंतर राजकुमार सिनेमात काम करण्यासाठी तयार झाले.
हेही वाचा - 'या' 2 अभिनेत्यांनी दाखवली राज कुमारला त्याची जागा; अशी उतरवली होती अभिनेत्याची घमेंड
तर दुसरीकडे दिलीप कुमार यांना सुभाष घईंना मनवण्यासाठी फार वेळ लागला नाही. कारण याआधी दिलीप कुमार यांनी सुभाष घईंच्या 'विधाता' आणि 'क्रांती' सारख्या सिनेमात एकत्र काम केलं होतं. दोन कलाकार एकमेकांचं कधीच तोंड पाहत नसले तरी त्यांना एकमेकांच्या कलेबद्दल कायम आदर असतो. या सिनेमातील एक महत्त्वाचा किस्सा म्हणजे, सुभाष घई यांनी राज कुमार यांना स्क्रिप्ट ऐकवली तेव्हा त्यांनी "माझ्याबरोबर दुसरं कोण काम करणार आहे?" असं विचारलं. त्यावर सुभाष घई यांनी, "दिलीप कुमार आहेत ना, ते करणार आहेत", असं सांगितलं. त्यावर राज कुमार म्हणाले होते की, "हिंदुस्तानात मी माझ्यानंतर कोणत्या अभिनेत्याला मानतो तर ते दिलीप कुमार आहेत".
अशाप्रकारे दिलीप कुमार आणि राज कुमार यांच्यात किती दुष्मनी असली तरी सुभाष घई मात्र यांच्यातील मैत्री परत आणण्यात यशस्वी ठरले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood actress, Bollywood News