Home /News /entertainment /

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती बिघडली, हिंदुजा रुग्णालयात दाखल

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती बिघडली, हिंदुजा रुग्णालयात दाखल

Dilip Kumar: बॉलिवूडचे ज्येष्ठ नेते दिलीप कुमार (Veteran actor Dilip Kumar) यांची प्रकृती संदर्भातली मोठी अपडेट समोर आली आहे.

    मुंबई, 06 जूनः बॉलिवूडचे ज्येष्ठ नेते दिलीप कुमार (Veteran actor Dilip Kumar) यांची प्रकृती संदर्भातली मोठी अपडेट समोर आली आहे. दिलीप कुमार यांना आज सकाळी खार येथील हिंदुजा (PD Hinduja Hospital) रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सकाळी 8.30 वाजता त्यांना रुग्णालयात आणण्यात आलं. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं या संदर्भातलं वृत्त दिलं आहे. सध्या डॉक्टर त्यांच्यावर उपचार करण्यात असल्याची माहिती समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, दिलीप कुमार यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. एक ते दोन दिवसात त्यांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. दिलीप कुमार यांच्या शरीरात हिमोग्लोबिनचं कमतरता आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून दर महिन्याला त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येतं.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Bollywood actor, Bollywood News

    पुढील बातम्या