मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

तारक मेहतामधील संस्कारी टप्पू खऱ्या आयुष्यात उद्धट? जेठालालनं उचललं मोठं पाऊल

तारक मेहतामधील संस्कारी टप्पू खऱ्या आयुष्यात उद्धट? जेठालालनं उचललं मोठं पाऊल

दिलीप जोशी राजवर नाराज आहेत. सेटवर दोघांमध्ये अनेकदा मतभेद होतात. सुरुवातीला हे मतभेद पटकथेवरुन होते असं वाटायचं परंतु आता तर दोघं एकमेकांसोबत बोलणं देखील टाळतात.

  • Published by:  Mandar Gurav

मुंबई 29 मे: तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणून ओळखली जाते. गेली 13 वर्ष ही मालिका सातत्यानं प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या पार्श्वभूमीवर मालिकेतील कलाकार खऱ्या आयुष्यात देखील तसेच सोज्वळ प्रवृत्तीचे असतील असं प्रेक्षकांना असं वाटू लागलं आहे. परंतु टीव्हीवर संस्कारी वाटणारी मंडळी खऱ्या आयुष्यात तसेच असतीलच असं नाही. असाच काहीसा प्रकार सध्या पाहायला मिळत आहे. तारक मेहतामध्ये जेठालाल साकारणारे दिलीप जोशी (Dilip Joshi) आणि त्यांच्या मुलाची भूमिका साकारणारा टप्पू उर्फ राज अंदकत (Raj Anadkat) यांच्यात वाद सुरु आहेत. (Jethalal and Tappu) अन् हे वाद आता इतके वाढले आहेत की दिलीप जोशींनी त्याला आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटमधून अनफॉलो केलं आहे.

कोईमोईनं दिलेल्या वृत्तानुसार दिलीप जोशी राजवर नाराज आहेत. सेटवर दोघांमध्ये अनेकदा मतभेद होतात. सुरुवातीला हे मतभेद पटकथेवरुन होते असं वाटायचं परंतु आता तर दोघं एकमेकांसोबत बोलणं देखील टाळतात. या भांडणामुळं राज अनेकदा सेटवर उशीरा येतो. परिणामी दिलीप जोशांना त्याच्यासाठी थांबावं लागतं. शिवाय मिळालेले डायलॉग्स देखील तो योग्य प्रकारे पाठ करत नाही. त्यामुळं शूटिंगचा कालावधी वाढतो. अन् हे मतभेद आता इतके वाढले आहेत. की दोघांनी एकमेकांना सोशल मीडिया अकाउंट्सवरुन अनफॉलो केलं आहे.

रुग्णालयातील परिचारीका कशी झाली प्रसिद्ध अभिनेत्री? पाहा अनुप्रियाचा थक्क करणारा प्रवास

तारक मेहतामधील वाद पहिल्यांदाच समोर आलेले नाहीत. यापूर्वी देखील मालिकेतील महिला कलाकारांच्या भांडणाची वृत्त समोर आली आहेत. अर्थात ही वृत्त निर्माते वारंवार फेटाळून लावतात. परंतु त्या कलाकारांचे सीन कमी झाल्यामुळं नक्कीच काहीना काही बिनसलं असल्याचं शक्यता वारंवार व्यक्त केली जाते.

First published:

Tags: Taarak mehta ka ooltah chashma