मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

‘दिल दोस्ती दुनियादारी’मधील अभिनेत्रीनं केला गुपचूप साखरपुडा; PHOTO होतोय व्हायरल

‘दिल दोस्ती दुनियादारी’मधील अभिनेत्रीनं केला गुपचूप साखरपुडा; PHOTO होतोय व्हायरल

अभिनेत्री ऋचा आपटे प्रचंड चर्चेत आहे. (Rucha Aapte) कारण तिनं कोणालाही न सांगता गुपचूप साखरपुडा उरकला.

अभिनेत्री ऋचा आपटे प्रचंड चर्चेत आहे. (Rucha Aapte) कारण तिनं कोणालाही न सांगता गुपचूप साखरपुडा उरकला.

अभिनेत्री ऋचा आपटे प्रचंड चर्चेत आहे. (Rucha Aapte) कारण तिनं कोणालाही न सांगता गुपचूप साखरपुडा उरकला.

  • Published by:  Mandar Gurav

मुंबई, 12 फेब्रुवारी: दिल दोस्ती दुनियादारी (Dil Dosti Duniyadari) ही छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणून ओळखली जाते. रेशमा, सुजय, कैवल्य, मीनल, अतुतोष आणि अना यांच्या यांच्या जबरदस्त केमिस्ट्रीमुळं या मालिकेनं लोकप्रियतेचं शिखर गाठलं. सध्या या मालिकेतील अभिनेत्री ऋचा आपटे प्रचंड चर्चेत आहे. (Rucha Aapte) कारण तिनं कोणालाही न सांगता गुपचूप साखरपुडा उरकला. खरं तर तिनं वर्षभरापुर्वीच अभिनेता क्षितीज दातेसोबत (Kshitij Date) साखरपुडा केला होता. परंतु चाहत्यांच्या आग्रहाखातर अखेर तिनं आयुष्यातील त्या अविस्मरणीय क्षणाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला.

ऋचानं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये क्षितीज आणि ऋचा यांचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे. दोघंही जवळपास दोन वर्ष एकमेंकांना डेट करत होते. अर्थात ही गोष्ट त्यांनी आपल्या चाहत्यांपासून लपवून ठेवली होती. परंतु सोशल मीडिया व व्हायरल होणाऱ्या त्यांच्या फोटो मार्फत अखेर दोघांच्या नात्याबाबत चाहत्यांना कळलेच. त्यानंतर ऋचा आणि क्षितीजनं पोस्ट केलेल्या प्रत्येक फोटो आणि व्हिडीओ खाली चाहते त्यांच्या नात्याबाबत त्यांना सवाल करत. अखेर चाहत्यांच्या आग्रहाखातर त्यांनी आपल्या नात्याचा खुलासा केला आहे. लक्षवेधी बाब म्हणजे आजच्याच दिवशी त्याच्या साखरपुड्याला एक वर्ष पुर्ण झालं. या निमित्ताने चाहत्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

अवश्य पाहा - बारामतीत अवतरले BIG B; स्वागताला आल्या खुद्द मिसेस उपमुख्यमंत्री

View this post on Instagram

A post shared by Rucha apte (@rucha.apte)

ऋचा ही मराठी मनोरंजन क्षेत्रातील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तुझ्यात जीव रंगला, दिल दोस्ती दुनियादारी अस्स माहेर नको गं बाई यांसारख्या अनेक मालिकेंमध्ये ती झळकली आहे. शिवाय मराठी चित्रपट आणि नाटकांमध्येही तिने महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. क्षितिज आणि ऋचा बन मस्का या मालिकेत एकत्र काम करत होते. त्यावेळी सेटवर त्यांची मैत्री झाली अन् पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. दरम्यान या सेलिब्रिटी जोडप्यावर सध्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

First published:

Tags: Entertainment