Home /News /entertainment /

'येऊ कशी तशी..' मालिकेत नवी एन्ट्री! 'दिल दोस्ती दुनियादारी' मध्ये साकारलीय महत्वाची भूमिका

'येऊ कशी तशी..' मालिकेत नवी एन्ट्री! 'दिल दोस्ती दुनियादारी' मध्ये साकारलीय महत्वाची भूमिका

'येऊ कशी तशी मी नांदायला'या मालिकेत एका नव्या अभिनेत्रीची एन्ट्री (New Entry) झाली आहे.

  मुंबई, 14 जानेवारी-   'येऊ कशी तशी मी नांदायला'   (Yeu Kashi Tashi Mi Nandayla)  या मालिकेने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. स्वीटू आणि ओमची केमिस्ट्री प्रेक्षकांना फारच भावली आहे. नाजूक, सडपातळ अभिनेत्री या विषयाला फाटा देत, या मालिकेने वजनदार मात्र तितकीच मायाळू आणि प्रेमळ, समजूतदार अभिनेत्री या मालिकेतून आपल्या भेटीला आणली. आणि या मालिकेने अल्पावधीतच मोठा चाहतावर्ग निर्माण केला. सध्या या मालिकेत अनेक बदल पाहायला मिळत आहेत. दरम्यान एका नव्या अभिनेत्रीची एन्ट्री   (New Entry)   या मालिकेत झाली आहे. पाहूया कोण आहे ही अभिनेत्री आणि काय असणार तिची भूमिका? झी मराठीवर 'येऊ कशी तशी मी नांदायला' ही मालिका आपल्या भेटीला येते. या मालिकेच्या अनोख्या विषयाने सर्वांनाच आकर्षित केलं. आज ही मालिका सर्वांचीच आवडती बनली आहे. मालिकेत सर्वच कलाकारांना प्रेक्षक भरभरून प्रेम देत आहेत. या मालिकेत काही नवीन बदल घडून येत आहेत. अनेक अडी-अडचणी पार करत अखेर स्वीटू आणि ओमचं लग्न झालं आहे. लग्नानंतर तर या दोघांना सुखाचे दिवस पाहायला मिळतील असं प्रेक्षकांना वाटत होतं. मात्र अडचणी या दोघांची पाठ सोडण्याचं नावच घेत नाहीत.
  View this post on Instagram

  A post shared by (@marathiserials_official)

  दरम्यान 'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेत एका नवीन अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून सुवेधा देसाई (Suvedha Desai)  आहे. यापूर्वी सुवेधा लोकप्रिय मालिका 'दिल दोस्ती दुनियादारी'   (Dil Dosti Duniyadari)  मध्ये दिसली होती. या मालिकेत सुवेधाने किंजलची भूमिका साकारली होती. किंजल ही आशुची गर्लफ्रेंड असते. या मालिकेत ती फारच विनोदी भूमिकेत होती. तिची भूमिका प्रेक्षकांना फारच पसंत पडली होती. शिवाय ही मालिकासुद्धा फारच लोकप्रिय झाली होती. त्यामुळेच या मालिकेचा दुसरा भाग सुद्द्धा आला होता. वेगवगेळ्या कारणांमुळे आपल्या घरापासून दूर असलेले मुलं-मुली एकत्र कसे येतात. एकत्र राहता-राहता या लोकांची किती घट्ट मैत्री जमते आणि त्यांनतर काय काय मजेशीर गोष्टी घडतात अशी ही मालिका होती. (हे वाचा:'मुलगी झाली हो' चं नवीन पोस्टर आलं समोर, पोस्टरमधून किरण मानेंना वगळलं ) सुवेधा देसाई आता आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे.तिनं नुकताच 'येऊ कशी तशी मी नांदायला' मध्ये एन्ट्री घेतली आहे. या मालिकेत ती चिन्याच्या गर्लफ्रेंडच्या भूमिकेत असल्याचं समोर आलं आहे. चिन्या अर्थातच तो स्वीटूचा लाडका भाऊ आहे. चिन्याला सुद्धा प्रेक्षकांकडून भरपूर प्रेम मिळतं. ही भूमिका अभिनेता अर्णव राजेनं साकारली आहे. त्याची भूमिका प्रचंड पसंत केली जाते. त्यांनतर आता सुविधा प्रेक्षकांना कितपत पसंत पडते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Marathi actress, Marathi entertainment, Zee marathi serial

  पुढील बातम्या