मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

रणबीर-आलियाच्या लग्नाच्या चर्चेदरम्यान ऋषी कपूर-नीतू सिंह यांची लग्नपत्रिका VIRAL, तुम्ही पाहिली का?

रणबीर-आलियाच्या लग्नाच्या चर्चेदरम्यान ऋषी कपूर-नीतू सिंह यांची लग्नपत्रिका VIRAL, तुम्ही पाहिली का?

बॉलिवूड  (Bollywood)  गंगुबाई अर्थातच आलिया भट्ट   (Alia Bhatt)  आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor)  यांच्या लग्नाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. मात्र, आतापर्यंत कपूर आणि भट्ट कुटुंबाने या वृत्तांवर मौन बाळगले आहे. आतापर्यंत त्यांच्या लग्नाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाहीय. परंतु मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघेही 13 ते 15 एप्रिल दरम्यान लग्नबंधनात अडकणार आहेत.

पुढे वाचा ...
  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 10 एप्रिल-  बॉलिवूड  (Bollywood)  गंगुबाई अर्थातच आलिया भट्ट   (Alia Bhatt)  आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor)  यांच्या लग्नाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. मात्र, आतापर्यंत कपूर आणि भट्ट कुटुंबाने या वृत्तांवर मौन बाळगले आहे. आतापर्यंत त्यांच्या लग्नाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाहीय. परंतु मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघेही 13 ते 15 एप्रिल दरम्यान लग्नबंधनात अडकणार आहेत. आधी दोघांच्या लग्नाची तारीख आली, मग पाहुण्यांची यादी.त्यांनतर त्यांच्या पोशाखाबद्दल माहिती समोर आली होती. दरम्यान आता एक खास गोष्ट समोर आली आहे. पाहूया काय आहे ती नेमकी गोष्ट.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या लग्नाची त्यांचे चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. रणबीर-आलियाच्या लग्नाच्या बातम्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. एकीकडे दोघांच्या लग्नाच्या तारखेची अद्यापही त्यांच्या कुटुंबीयांकडून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही, तर दुसरीकडे रणबीर-आलिया 14 एप्रिलला लग्नबंधनात अडकणार असल्याचा दावा अनेक माध्यमांनी केला आहे.या दोघांच्या लग्नाची पत्रिका अद्यापही समोर आलेली नाहीय. मात्र या दरम्यान रणबीरच्या आई वडिलांची अर्थातच ऋषी कपूर   (Rishi Kapoor)  आणि नीतू सिंह   (Neetu Singh)  यांची लग्नपत्रिका समोर आलेली आहे. आणि ती सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

गेली काही सोशल मीडियावर एक लग्नपत्रिका प्रचंड व्हायरल होत आहे. ही लग्नपत्रिका दुसऱ्या कोणाची नसून ऋषी कपूर आणि नीतू सिंह यांची आहे. पत्रिका फारच जुनी असल्याने थोडीशी काळपट दिसत आहे. मात्र ही पत्रिका पाहण्यासाठी चाहते फारच उत्सुक आहेत. पांढऱ्या रंगामध्ये अगदी साधी अशी ही पत्रिका आहे. यावर मोठ्या अक्षरात वर RK असं लिहिण्यात आलंय. सोबतच अक्षरांत राज कपूर यांचं नाव लिहिण्यात आलं आहे. ऋषी कपूर यांच्या दोन्ही काकांचं नाव यात पाहायला मिळत आहे. त्यांनतर त्यांच्या मोठ्या भावाचं नावसुद्धा पत्रिकेवर दिसून येत आहे. ही प्रिक इंग्लिशमध्ये छापण्यात आली आहे.

ऋषी कपूर आणि नीतू सिंह हे त्या काळातील रोमँटिक जोड्यांपैकी एकहोते होते. त्यांची जोडी प्रचंड पसंत केली जात होती. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. त्यांचं लग्न 23 जानेवारी 1980 मध्ये झालं होतं. हा विवाहसोहळा RK स्टुडिओमध्ये पार पडला होता. यामध्ये बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते. त्यांच्या प्रमाणेच रणबीर कपूर आणि आलिया भट्टची जोडी चाहत्यांना प्रचंड पसंत पडत आहे.चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहात आहेत.

First published:

Tags: Alia Bhatt, Bollywood, Entertainment, Ranbir kapoor