Mission Mangalच्या अभिनेत्रींमध्ये झाली जबरदस्त कॅटफाइट? विद्या बालननं सांगितलं...

Mission Mangalच्या अभिनेत्रींमध्ये झाली जबरदस्त कॅटफाइट? विद्या बालननं सांगितलं...

या सिनेमात 5 आघाडीच्या अभिनेत्री असल्यानं सेटवर त्यांच्यामध्ये भांडणं झाली का? प्रश्न सर्वांनाच पडला होता. मात्र आता अभिनेत्री विद्या बालननं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याचं उत्तर दिलं आहे.

  • Share this:

मुंबई, 18 ऑगस्ट : अक्षय कुमार आणि विद्य बालन यांच्या प्रमुख भूमिका असलेला सिनेमा मिशन मंगल सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. या सिनेमातील विद्या बालनच्या अभिनयाचं खूप कौतुक केलं जात आहे. विद्या आणि अक्षय यांच्या व्यतिरिक्त या सिनेमामध्ये तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, कीर्ती कुल्हारी, आणि नित्या मेमन यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या सिनेमात 5 आघाडीच्या अभिनेत्री असल्यानं सेटवर त्यांच्यामध्ये भांडणं झाली का? त्यांच्यातील संबंध कसे होते. असे चाहत्यांचे प्रश्न स्वाभाविक होते. मात्र त्यांच्या या सर्व प्रश्नांची उत्तर अभिनेत्री विद्या बालननं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दिली आहेत.

'मिड डे'ला दिलेल्या एका मुलाखतीत विद्याला हा प्रश्न विचारण्यात आला. सिनेमाच्या सेटवर इतक्या साऱ्या अभिनेत्री असताना त्यांच्यात काही वाद किंवा कॅटफाइट झाली का असं विद्याला विचारण्यात आलं. यावर विद्या सुरुवातीला हा प्रश्नावर हसू आलं. ती म्हणाली, ही स्वाभाविक गोष्ट आहे. लोकांच्या मते जेव्हा अनेक अभिनेत्री एका सिनेमात काम करत असतात त्यावेळी त्यांच्यात वाद, एकमेकींप्रती असुरक्षितता इत्यादी गोष्टी असतात. मात्र मला प्रत्येकवेळी खूपच वेगळा अनुभव आला आहे.

डोली लेके आना...! 'या' बॉलिवूड अभिनेत्रीला दबंग सलमानसोबत करायचंय लग्न

 

View this post on Instagram

 

Team #MissionMangal is all set to launch the first song #DilMeinMarsHai. Out today.

@akshaykumar @aslisona @balanvidya @sharmanjoshi @nithyamenen @iamkirtikulhari

@foxstarhindi #HopeProductions #JaganShakti @zeemusiccompany

A post shared by Taapsee Pannu (@taapsee) on

विद्या पुढे म्हणाली, मी याआधी 'बेगम जान'मध्येही फिमेल कास्टसोबत काम केलं आहे. त्यावेळीही आमच्यात कधीच कॅटफाइट झाली नाही आणि आता यावेळी यावर जास्तच विश्वास बसला. कारण तापसी पन्नू, नित्या मेमन, सोनाक्षी सिन्हा, कीर्ती कुल्हारी अशा सर्वच स्टार अभिनेत्री होत्या मात्र आमच्यात कोणतेच वाद नव्हते. एकत्र काम करण्याचा अनुभव आनंददायी होता आणि आम्हाला अजिबात असुरक्षित वाटलं नाही. अगोदरच्या काळात अभिनेत्रींमध्ये काटफाइट होत असत. मात्र आता असं होत नाही आज महिला एकमेकींच्या सोबत उभ्या राहतात.

अर्जुनच्या काकानं मलायका अरोराला केलं ट्रोल, वाचा फोटोवर केलेली 'ही' कमेंट

मिशन मंगलच्या कमाई बद्दल बोलायचं तर हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई करत आहे. अवघ्या 3 दिवसात या सिनेमानं जवळपास 70  कोटींचा गल्ला पार केला आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन जगन शक्ती यांनी केलं असून हा सिनेमा 15 ऑगस्टला स्वतंत्रदिनाच्या मुहूर्तावर रिलीज झाला होता.

प्रेग्नन्सीच्या चर्चांवर भडकली विद्या बालन; म्हणाली, मागची 7 वर्ष...

======================================================================

SPECIAL REPORT: माणसाच्या संगतीत बोकड गेला वाया, पाल्याऐवजी खर्रा खाण्याचं व्यसन!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 18, 2019 02:29 PM IST

ताज्या बातम्या