कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा रिलेशनशीपमध्ये? त्यांच्या नात्याबाबत अक्षय कुमारने केलं हे वक्तव्य
कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा रिलेशनशीपमध्ये? त्यांच्या नात्याबाबत अक्षय कुमारने केलं हे वक्तव्य
कियारा अडवाणी (Kiara Adwani) आणि सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चांना आता अक्षय कुमारच्या या वक्तव्यामुळे आणखी उधाण आले आहे.
मुंबई, 03 नोव्हेंबर : सध्या बॉलिवूडमध्ये लगीनसराईचे दिवस सुरू आहेत. अनेक कलाकारांनी कोरोना काळात लग्नसोहळा उरकला आहे. त्याचबरोबर काही नवीन जोड्या लग्नबंधनात अडकणार का याची चर्चा सध्या मनोरंजन विश्वात सुरू आहे. कियारा अडवाणी (Kiara Adwani) आणि सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) यांच्या नात्याची चर्चा बॉलिवूड विश्वात आहे. दोघांनीही त्यांच्या नात्याच्या अद्याप खुलासा केला नाही आहे, मात्र द कपिल शर्मा शो मध्ये (The Kapil Sharma Show) अक्षय कुमारने (Akshay Kumar) केलेल्या एका वक्तव्यामुळे त्यांच्या नात्याबाबत आणखी चर्चा सुरू झाली आहे. अक्षय आणि कियारा त्यांचा नवा सिनेमा 'लक्ष्मी'च्या (Lakshmi) प्रमोशनसाठी कार्यक्रमात आले होते. त्यावेळी कियाराची गंमत करताना अक्षयने हे वक्तव्य केलं आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल (Video Viral on Social Media) होत आहे.
या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो, कपिल शर्मा कियाराला तिच्या रिलेशनशीपविषयी विचारतो. त्यावेळी उत्तर देताना कियारा म्हणते की, 'जेव्हा मी माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलेन, ते थेट मी माझ्या लग्नाविषयीच असेल.' त्यावेळी आधीच तिच्या उत्तराकडे लक्ष देऊ असलेला अक्षय कुमार असे म्हणतो की, 'ये बडी सिद्धांतोवाली लडकी है...'
(हे वाचा-नोरा फतेहीला 2 शर्मा सिस्टर्सची टक्कर; अफलातून VIDEO यूट्यूबवर हिट)
अक्षयच्या या उत्तरानंतर कार्यक्रमात एकच हशा पिकलेला पाहायला मिळाला. अभिनेत्री कियारा अडवाणी देखील हसण्यापासून स्वत:ला रोखू शकली नाही.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे-
Band baja baraat 2021 me pakka samjho bhai ab
Kyu ki ye sidhant wali ladki ha.
pic.twitter.com/hL8Cvq1pPr
सोशल मीडियावर सध्या लक्ष्मी सिनेमाचं मोठ्या प्रमाणात प्रमोशन सुरू आहे. गेल्या महिनाभरापासून हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात देखील अडकला होता. या सिनेमाच्या नावावर अनेकांचा आक्षेप होता तर काहींचा यावरील पात्रावर. अखेरीस 'लक्ष्मी' या शब्दापुढे असणारा 'बॉम्ब' हा शब्द काढून सिनेमाचं नाव 'लक्ष्मी' निश्चित करण्यात आलं आहे. येत्या 9 नोव्हेंबरला हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
Published by:Janhavi Bhatkar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.