Love Breakups Zindagi ! आणखी एका बॉलिवूड अभिनेत्रीचा घटस्फोट, 11 वर्षांच्या नात्याचा अंत

Love Breakups Zindagi ! आणखी एका बॉलिवूड अभिनेत्रीचा घटस्फोट, 11 वर्षांच्या नात्याचा अंत

2017 मध्ये अरबाज-मलायका एकमेकांपासून वेगळे झाले. त्यानंतर अर्जुन रामपाल, हृतिक रोशन सारख्या अनेक बॉलिवूड कलाकारांनी घटस्फोट घेत अनेक वर्षांपासूनचं नातं संपवलं.

  • Share this:

शिखा धारिवाल

मुंबई, 1 ऑगस्ट : बॉलिवूडमध्ये मागच्या काही काळापासून अनेक प्रसिद्ध जोड्यांची लग्नं तुटलेली पाहायला मिळत आहेत. दोन वर्षांपूर्वी म्हणजे 2017 मध्ये अरबाज-मलायका एकमेकांपासून वेगळे झाले. त्यानंतर अर्जुन रामपाल, हृतिक रोशन सारख्या अनेक बॉलिवूड कलाकारांनी घटस्फोट घेत अनेक वर्षांपासूनचं नातं संपवलं. ज्यामुळे सोशल मीडियावर त्याची खूप चर्चा सुद्धा झाली. कारण एवढ्या वर्षांचं नातं अशाप्रकारे तुटण्याची चाहत्यांना अपेक्षा नव्हती. या जोड्यांचे घटस्फोट झाल्यानंतरही काहींमध्ये अद्याप मैत्रीपूर्ण संबंध आहेत. बॉलिवूड कलाकरांच्या घटस्फोटांच्या यादीत आता आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या नावाची भर पडली आहे.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दिया मिर्झाचं नाव आता या यादीत जोडलं गेलं आहे. दिया मिर्झानं तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून या गोष्टीचा खुलासा केला असून 5 वर्षांच्या संसारानंतर दियानं तिचा पती साहिल संघा याला घटस्फोट दिला आहे. हे नातं संपलं असलं आम्ही वेगळे झालो असलो तरीही आमच्यामध्ये मैत्रीचं नातं कायम राहील असा उल्लेखही तिनं तिच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये केला आहे.

या Instagram सेलेब्रिटीची झाली खळबळजनक हत्या; सूटकेसमध्ये मिळाला मृतदेह

 

View this post on Instagram

 

Creating precious memories 💗 Happy Birthday Mamma!!!

A post shared by Dia Mirza (@diamirzaofficial) on

दिया मिर्झानं तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. ज्यात तिनं लिहिलं, ‘11 वर्षांच्या जीवनाच्या प्रवासानंतर आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्यातील हे नातं संपलं असलं तरीही आम्ही एकमेकांचे मित्र नक्की असणार आहोत. एकमेकांबद्दल आदर नेहमीच कायम राहील. आमच्या या प्रवासात आम्हाला सदैव साथ देणाऱ्या आमच्या कुटुंबीयांचे आणि मित्रपरिवाराचे आभार- दिया मिर्झा आणि साहिल संघा.’

बॉलिवूडची 'ही' अभिनेत्री करणार 15 वर्षांनी लहान बॉयफ्रेंडशी लग्न

 

View this post on Instagram

 

A post shared by Dia Mirza (@diamirzaofficial) on

साहिल संघानं दिया मिर्झाशी 2014 मध्ये लग्न केलं होतं. या दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर दिसत आहेत. दिया मिर्झानं 'रहना है तेरे दिल में' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर 'तुमको ना भूल पाएंगे', 'तुमसा नहीं देखा', 'दस', 'लगे रहो मुन्ना भाई' आणि 'संजू' या सिनेमात तिनं काम केलं. याशिवाय नुकतीच ‘काफिर’ ही वेबसीरिज सुद्धा रिलीज झाली आहे.

मीना कुमारी यांना खरंच तिहेरी तलाक देण्यात आला होता का?

====================================================================

दोस्ती आहे ना भाऊ! उंदीर आणि मांजराचा मस्तीचा VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 1, 2019 01:17 PM IST

ताज्या बातम्या