23 आॅक्टोबर : बिग बॉसच्या सीझनची पहिली वाइल्ड कार्ड एंट्री झाली आहे. ही नवीन सदस्य म्हणजे ढिंच्याक पूजा. स्टेजवर येण्यापासून ते बिग बॉसच्या घरात जाईपर्यंत सलामान खानने ढिंच्याक पूजाच्या नावावर सगळ्यांचंच मनोरंजन केलं. तिला अगदी वेलकम केल्याबरोबरच सलमानने तिच्या नावामागचं रहस्य विचारलं. त्यावर पूजा म्हणाली की तिचं खरं नाव पूजा जैन आहे. तिच्या ढिंच्याक स्टाईलमुळे तिने तिच्या नावाआधी ढिंच्याक असं लावलं आहे.
याच दरम्यान सलमान म्हणाला की त्याच्या आई-वडिलांचं स्वप्न आहे की सलमानने एकदा ढिंच्याक पूजासोबत गाणं गावं. त्यामुळे सलमानने पूजाला गाणं गाण्यासाठी सांगितलं. खरं तर अशा पद्धतीने गाणं गाण्यासाठी ती तयार होत नाही पण सलमानसाठी पूजाने लगेचंच गाण गायलं.
पूजाने 'सेल्फी मैने लेली आज' या गाण्याला सुरुवात केली तस सलमान लगेच कॅमेरासमोर आला आणि म्हणाला की 'तुम्ही या गाण्याला हिट केलं, पण हे गाणं तर सुपरहिट झालं पाहिजे'. यानंतर सलमाननेही तिच्यासोबत गाणं गायला सुरुवात केली पण सलमान पूजासारखं गाऊ शकला नाही म्हणून त्याने त्याच्या आईवडिलांची माफीही मागितली.
ही गाण्याची स्पर्धा झाल्यानंतर पूजा बिग बॉसच्या घरात गेली. पूजाने घरात एंट्री केली आणि तिच्या स्वागतासाठी घराच्या आत एक स्कुटर ठेवली होती. या स्कूटरला पाहून सगळेच जण खुश झाले होते पण जस ढिंच्याक पुजाचं गाण वाजलं तस सगळ्यांच्याच लक्षात आलं की पुजा येणार आहे. यावर सगळ्यांच्याच वेगवेगळ्या प्रतिक्रिया होत्या. हिना तर सारखी सारखी तोंड वाकडं करून बिग बॉस ढिंच्याक पूजा? असं म्हणत होती. त्यातच शिल्पा शिंदे सगळ्यांना पूजाबद्दल ज्ञान देताना दिसली. एकंदरीतच काय तर बिग बॉसच्या घरातला पूजाचा एपिसोड चांगलाच रंगला. आता पहायचं हेच आहे की पुढचा एपिसोड आपल्यासाठी कोणता मसाला घेऊन येतोय.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा