बिग बाॅसच्या घरात ढिंच्याक पूजा कोणाच्या प्रेमात पडलीय?

वाईल्ड कार्ड एंट्रीने ढिंच्याक पूजा बिग बॉसच्या घरात आली आणि आता ती प्रेमातही पडली.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Nov 1, 2017 04:27 PM IST

बिग बाॅसच्या घरात ढिंच्याक पूजा कोणाच्या प्रेमात पडलीय?

01 नोव्हेंबर : ढिंच्याक गाण्यांमुळे प्रसिद्ध झालेली यूट्यूब स्टार ढिंच्याक पूजा आता प्रेमात पडली आहे. वाईल्ड कार्ड एंट्रीने ढिंच्याक पूजा बिग बॉसच्या घरात आली आणि आता ती प्रेमातही पडली. ती बिग बॉसचा स्पर्धक लव त्यागीच्या प्रेमात पडली आहे.

असंही बिग बॉसच्या घरात राहणाऱ्या स्पर्धकांना एकमेकांमध्ये आपले मित्र दिसतात आणि त्यातूनच ते प्रेमातही पडतात. मागच्या सीझनमध्ये मनू आणि मोना यांची लव्ह स्टोरी हिट झाली होती. तसंच आता 11व्या सीझनमध्येही ही नवीन लव्ह स्टोरी हिट होऊ शकते.

आतापर्यंत घरात फक्त बंदगी आणि पुनीष यांच्या प्रेमाच्या चर्चा होत्या. आता ढिंच्याक पूजाच्या प्रेमाची चर्चा चांगलीच रंगणार असं दिसतय. ढिंच्याक पूजा लव त्यागीच्या प्रेमात पडली आहे. 30 ऑक्टोबरला दाखवण्यात आलेल्या एपिसोडमध्ये पूजा प्रेमाच्या विचारांत दंग झालेली दिसली. पूजाने आकाश आणि अर्शीला ती लव त्यागीच्या प्रेमात असल्याचं सांगितलं. घरातही तिला आणि लवला एकमेकांच्या नावाने चिडवतात.

आता हे खरंच प्रेम आहे की शोमधला मसाला आहे. हे पुढच्या एपिसोडमध्ये आपल्याला समजेलंच. पण तरीही हे नवं प्रेम खरंच यशस्वी होणार का? लव त्यागीही ढिंच्याक पूजावर प्रेम करतो का?  हे बघणं आता उत्सुकतेचं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 1, 2017 04:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...