#Dhinchakpooja... सिर्फ नामही काफी है!

#Dhinchakpooja... सिर्फ नामही काफी है!

गाणं नक्की ऐका, पण तुमच्या स्वत:च्या जबाबदारीवर!

  • Share this:

21 मे यु-ट्युबने आजवर अनेक भावी कलाकारांना आपलं कौशल्य जगासमोर आणण्याचं एक व्यसपीठ उपलब्ध करून दिलं आहे. सनम पुरी, विद्या वाॅक्स (Vox), श्रद्धा शर्मा ही त्यापैकीच काही नावं... या गायकांनी आपल्या सुरेल आवाजाच्या माध्यमातून जगभरातील रसिकांवर आपली मोहिनी पसरवली आहे. यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओजमुळे आज हे कलाकार प्रसिद्धीच्या झोतात आहेत. पण असं कोण म्हणतं की फक्त 'सुरेल' गाणाऱ्यालाच प्रसिद्धी मिळते...?

सोशल मीडियावर आज काल फक्त एकाच मुलीची चर्चा आहे... तिचं स्वत:चं 'ढिंच्याक पूजा' नावाचं यु-ट्युब पेज आहे, ज्याला 25 हजारपेक्षा जास्त लोकांनी सबस्क्राईब केलं आहे. आता तुम्ही म्हणाल काय आहे हिच्यात एवढं..? तर हे ऐका, तिच्या 'सुरेल' आवाजाची एक झलक...

कसं वाटलं...? आवडलं का...

माफ करा... तुमचा छळ करण्याचा आमचा काहीही हेतू नव्हता. पण या ढिंच्याक पूजाने सोशल मीडियावर तिच्या 'सुरेल' आवाजाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. तुम्हालाही या 'ढिंच्याक' गायिकेबद्दल थोडी माहिती असावी म्हणून केलेला हा खटाटोप.

ही गाणी ऐकून तुम्हाला अगदी कुठे तरी जाऊन डोकं फोडावसं वाटू शकतं... किंवा कोणाचा तरी जीव घ्यावासाही वाटू शकतो... पण कंट्रोल... अशा प्रतिक्रिया देणारे सोशल मीडियावरचे तुम्ही काही पहिले नाहीत हे नक्की. सोशल मीडियावर तर #Dhinchakpooja हा हॅशटॅग वापरून नेटिझन्सने भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 21, 2017 06:31 PM IST

ताज्या बातम्या