ढिंच्याक पूजाचा पाकिस्तानी चाहता, 'सेल्फी मैंने..'चं केलं रॅप साँग

ढिंच्याक पूजाचा पाकिस्तानी चाहता, 'सेल्फी मैंने..'चं केलं रॅप साँग

तिच्या गाण्यावर फिदा होऊन एका पाकिस्तानी सिंगरने 'सेल्फी मैंने ले ली आज'चं पाकिस्तानी व्हर्जन आणलंय.

  • Share this:

05 जुलै : आपल्या सुरेल आवाजामुळे ढिंच्याक पूजाचे गाणे नेहमी चर्चेत असतात. पण आता तर पूजाची चर्चा भारतापूरतीच मर्यादित राहिलेली नाही. पाकिस्तानातही तिची गाणी बरीच गाजत आहे. तिच्या गाण्यावर फिदा होऊन एका पाकिस्तानी सिंगरने 'सेल्फी मैंने ले ली आज'चं पाकिस्तानी व्हर्जन आणलंय.

हा व्हर्जन म्हणजे साधसुधा रॅप साँग नाहीय. तर चक्क एक अॅन्थम आहे. खूप सुरेल आवाजात हे गाणं गायलंय. या गाण्याचं नाव आहे 'सेल्फी अॅन्थम'. या गाण्याच्या गायकाचं नाव आहे 'हनी किंग'.

हनी किंगच्या या गाण्याच्या व्हिडिओत गायकाच्या बॅकग्राउंडवर  पूजाचेचं फोटो लावलेत. याचं कारण गायकाला विचारलं असता तो म्हणाला 'पूजा लोकांचं मनोरंजन करते आणि म्हणून मला तिच्याबद्दल खूप आदर वाटतो. याच कारणामुळे तिचे फोटो लावलेत.' हे गाणं सध्या पाकिस्तानात प्रचंड गाजतंय.

चला तर पाकिस्तानात पूजाला बरेच फॅन मिळाले आहेत असं दिसतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 5, 2017 09:38 PM IST

ताज्या बातम्या