S M L

...आणि ढिंच्याक पूजाचं आलं आणखी एक गाणं

विशेष म्हणजे तिने 'पब्लिक डिंमाड' म्हणून 'दिलो का शुटर है मेरा स्कुटर' हे गाणं रिलीज केलंय.

Sachin Salve | Updated On: Jun 26, 2017 09:18 PM IST

...आणि ढिंच्याक पूजाचं आलं आणखी एक गाणं

26 जून : आपल्या 'सुरेल' आवाजाने युट्यूबवर भल्याभल्यांची झोप उडवणारी ढिंच्याक पूजा आता आणखी एक नवं कोरं गाणं घेऊन आलीये. विशेष म्हणजे तिने 'पब्लिक डिंमाड' म्हणून 'दिलो का शुटर है मेरा स्कुटर' हे गाणं रिलीज केलंय.

'युट्यूब'वर जर तुम्ही सर्चमध्ये पूजा नाव नुसतं टाईप केलं तर सहज ढिंग्चाक पूजाचे व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास मिळतील. तिच्या सुरेल गाण्यांनी सोशलमीडियाकारांच्या नाकीनऊ आणले आहे.

'स्वॅग वाली टोपी', 'दारु-दारु' आणि 'सेल्फी मैने ले ली आज' या गाण्यांनी तर अक्षरश: धुमाकूळ घातलाय. आतापर्यंत या व्हिडिओंना लाखो व्ह्यूज मिळाले आहे. आता त्यात आणखी एका गाण्याची भर पडली. पब्लिक डिमाण्ड म्हणून तिचं 'दिलो का शुटर है मेरा स्कुटर' गाणं सोशल मीडियावर व्हायरलं झालंय.विशेष म्हणजे यावेळी पूजा ऑडीमध्ये नव्हे तर स्कुटरवर स्वार झालीये. बरं गमंत म्हणजे तिची गाणी जेवढी गाजली तेवढीच लोकांनी तिची खिल्लीसुद्धा उडवली. रविवारी तिनं हे गाणं रिलीज केलं आणि दोनच दिवसांत या गाण्याला साडेपाच लाखांहुन अधिक व्ह्युज सुद्धा मिळाले आहे. एकंदरीतच काय तर कुणी काहीही म्हणा  ढिंच्याक पूजा काही मागे हटणार नाही एवढं मात्र नक्की...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 26, 2017 09:18 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close