ढिंच्याक पूजाची बिग बॉसमध्ये एन्ट्री?

ढिंच्याक पूजाची बिग बॉसमध्ये एन्ट्री?

सुपर मॉडल आणि बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलेला स्पर्धक प्रियांक शर्मा याच्यासोबत वाईल्ड कार्ड एंट्रीने ती बिग बॉसच्या घरात येणार असल्याच बोललं जातंय. प्रियांकला आकाश ददलानी आणि विकास गुप्ता यांच्याशी हाणामारी केल्याबद्दल घराबाहेर काढण्यात आलं होतं

  • Share this:

18 ऑक्टोबर: आपल्या गाण्यांनी सोशल मीडियावर प्रचंड प्रसिद्ध होणाऱ्या ढिंच्याक पूजाची बिग बॉसच्या घरात आता एन्ट्री होण्याची शक्यता आहे. 'सेल्फी मैंने ले ली आज', 'स्वैग वाली टोपी..', 'दिलों का शूटर है मेरा स्कूटर' अशा अनेक गाण्यांनी पुजाने सोशल मीडियावर चांगलाच प्रतिसाद मिळवला. त्यामुळे बिग बॉसमध्ये सुध्दा तिची एंट्री अशीच धमाकेदार असणार हे नक्की.

सुपर मॉडल आणि बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलेला स्पर्धक प्रियांक शर्मा याच्यासोबत वाईल्ड कार्ड एंट्रीने ती बिग बॉसच्या घरात येणार असल्याच बोललं जातंय. प्रियांकला आकाश ददलानी आणि विकास गुप्ता यांच्याशी हाणामारी केल्याबद्दल घराबाहेर काढण्यात आलं होतं. पण आता तो परत येणार असं एका वेबसाईटच्या मुलाखतीत त्याने सांगितलं आहे. 'रागात मी काही चुकीचे निर्णय घेतले त्यामुळ मला घराबाहेर जाव लागलं पण आता बिग बॉसच्या घरात धमाका होणार आहे. सलमान खानच्या सल्याने आणि एक नवी सुरवात करुन मी बीग बॉसमध्ये परत येणार' असल्याचं त्याने सांगितलं आहे.

खरंतर पूजाच्या एंट्रीची चर्चा सिझनला सुरु झाल्यापासुनच आहे. पण याबद्दल काही ठोस माहिती मिळाली नव्हती. त्यामुळे संभ्रमात असलेली पुजा बिग बॉसमध्ये येऊन काय धम्माल करते हे आता तिच्या आणि बिग बॉसच्या चाहत्यांसाठी औत्सुक्याचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 18, 2017 08:51 PM IST

ताज्या बातम्या