Home /News /entertainment /

धर्मेंद्रना आली साधनाची आठवण; एकाच सिनेमात दोघे होते एकत्र पण...

धर्मेंद्रना आली साधनाची आठवण; एकाच सिनेमात दोघे होते एकत्र पण...

धर्मेंद्रने यांनी शेअर केलेल्या फोटोत हे दोघंही एकमेकांशी हसतखेळत गप्पा मारताना दिसत असून, दोघांच्याही हातात ड्रिंकचे ग्लास आहेत.

    मुंबई, 17 मे: बॉलिवूडचे(Bollywood) दिग्गज कलाकार असलेल्या धर्मेंद्र(Dharmendra) यांनी अलीकडेच आपली दिवंगत सहकलाकार अभिनेत्री साधना (Sadhana Shivdasani)यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. साधना यांच्याबरोबरचा एक जुना फोटो शेअर करत त्यांनी आपल्याला साधना यांच्याबरोबर एकाच चित्रपटात काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल खंत व्यक्त केली आहे. अतिशय सुंदर डोळे असलेल्या साधना आपलं निरागस सौंदर्य, नृत्य कौशल्य आणि दर्जेदार अभिनय यामुळे 60 ते 80च्या दशकातील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री होत्या. कपाळावर रुळणाऱ्या केसांच्या बटांची त्यांची वैशिष्ट्यपूर्ण केशरचना त्याकाळी इतकी लोकप्रिय झाली की ती त्यांच्याच नावानं म्हणजे साधना कट(Sadhana Cut)म्हणून प्रसिद्ध झाली. आजही साधना म्हटलं की साधना कट आठवतो. मेरा साया,वह कौन थी,वक्त असे त्यांचे अनेक चित्रपट गाजले. आजही त्यांच्या चित्रपटातील गाणी लोकप्रिय आहेत. VIDEO प्रसिद्ध मालिकेचा सेट Cyclone Tauktae मुळे उद्ध्वस्त; क्रू मेंबर्सची पळापळ धर्मेंद्रने यांनी शेअर केलेल्या फोटोत हे दोघंही एकमेकांशी हसतखेळत गप्पा मारताना दिसत असून, दोघांच्याही हातात ड्रिंकचे ग्लास आहेत. एखाद्या पार्टीतील हा फोटो आहे. यामध्ये धर्मेंद्रयांनी सूट घातलेला आहे, तर साधना साडीमध्ये आहेत. दोघंही अतिशय देखणे दिसत असून हा एक दुर्मीळ फोटो आहे. कारण धर्मेंद्र यांनी साधना यांच्याबरोबर; 'इश्क पर जोर नहीं' या एकाच चित्रपटात काम केलं होतं. फोटोसोबत धर्मेंद्र यांनी एक पोस्टही लिहिली आहे. यात ते म्हणतात की, साधना, एक या एक अतिशय उत्तम कलाकार आणि उत्तम व्यक्ती होत्या. दुर्दैवानं मी त्यांच्याबरोबर एकच चित्रपट करू शकलो. धर्मेंद्र यांच्या या पोस्टला चाहत्यांकडून चांगलीच पसंती मिळत असून, चाहतेही उस्फूर्त प्रतिसाद देत आहेत. साधना या अतिशय उत्तम अभिनेत्री होत्या, त्यांची केशरचना मुलींमध्ये खूपच प्रसिद्ध होती; अशी कमेंट एका युजरनं केली केली आहे. ‘असा मेसेज दिसल्यास व्हा सावध’; सोनू सूदनं चाहत्यांना केलं सतर्कतेचं आवाहन सध्या या कोरोना साथीच्या काळात धर्मेंद्र आपल्या फार्म हाऊसवर(Farm House)वास्तव्यास असून,ते सोशल मीडियावर चांगलेच अॅक्टिव्ह आहेत.अलीकडेच त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून(Instagram)सर्वांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करणारा एक व्हिडिओ शेअर केला होता आणि कोरोनापासून वाचण्यासाठी सुरक्षिततेसाठीच्या सूचना दिल्या होत्या. "मित्रांनो, या कोरोनानं(Corona Pandemic)सगळ्या जगाच्या नाकीनऊ आणलं आहे. मी लॉकडाउनच्या(Lockdown)एकच दिवस आधी माझ्या फार्महाऊसवर आलो आहे. दररोज मी बातम्या ऐकत असतो. त्या ऐकून मला खूप दुःख होते. या रोगाची साथ लवकरच संपेल अशी मी प्रार्थना करतो," असं त्यांनी या व्हिडिओत म्हटलं आहे.
    First published:

    Tags: Bollywood, Dharmendra deol

    पुढील बातम्या