मुंबई, 23 मे: उत्कृष्ट अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक (Prasad Oak) सध्याचा मराठीतील आघाडीचा अभिनेता ठरला आहे. प्रसादने स्वत:दिग्दर्शित केलाल चंद्रमुखी (Chandramukhi) आणि अभिनयाच्या मुख्य भूमिकेत असलेल्या धर्मवीर (Dharmavir) सिनेमाने प्रसादची कलाकार आणि दिग्दर्शक अशा दोन्ही बाजू योग्यरित्या उचलून धरल्या. प्रसादच्या दोन्ही सिनेमांना उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे पण चंद्रमुखी सिनेमाची अजूनही चर्चा आहे. अभिनेत्री अमृता खानविलकरने (Amruta Khanvilkar) सिनेमात चंद्रमुखीची प्रमुख भूमिका साकारली. या भूमिकेसाठी अमृताने प्रचंड मेहनत घेतल्याचं आपण सिनेमातून पाहिलं आहे. आतापर्यंत न केलेली अशी अनेक कामे अमृताने या सिनेमासाठी केली आहेत. नुकतीच अमृताने एक पोस्ट केली असून त्यावर दिग्दर्शक प्रसाद ओकची भन्नाट कमेंट चांगलीच चर्चेत आली आहे.
आपल्याला माहिती असेल अमृताने चंद्रमुखी सिनेमासाठी 8 किलो वजन वाढवलं होतं. त्याचप्रमाणे तिने पहिल्यांदा नाक देखील टोचलं. अनेक नव्या गोष्टी अमृताने सिनेमासाठी केल्या. त्यातली आणखी एक गोष्ट आता प्रेक्षकांसमोर आली आहे. ती म्हणजे सिनेमात अमृताने पहिल्यांदा घागर उचलली आहे. सिनेमातील बत्ताशा मामा आणि चंद्राच्या एका सिनमधील काही BTS फोटो अमृताने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. याच फोटोंवर दिग्दर्शक प्रसाद ओकने भन्नाट कमेंट केली. ज्यावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं.
'माझा आणि बत्ताशा मामाचा चंद्रमुखीमधील एडीट मोंटाज', असं म्हणतं अमृताने तिचे फोटो शेअर केले आहेत. एका फोटोत चंद्रा कंबरेवर घागर घेऊन उभी आहे तर दुसऱ्या फोटोत चंद्रा आणि बत्ताशा मामा एकमेकांशी बोलत आहेत. अमृताच्या या फोटोवर 'आयुष्यात पहिल्यादांच "एक माणूस" घागर उचलतं तेव्हा' अशी भन्नाट कमेंट केली आहे. प्रसादच्या या कमेंटवर अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे. सध्या प्रसादची कमेंट चर्चेचा विषय ठरला आहे.
अमृताच्या फोटोवर चाहत्यांनी कमेंट करत अमृताचं कौतुक केलं आहे. एका युझरने म्हटलेय, 'अरे पण घागर तर रिकामी आहे'. तर दुसऱ्यानं म्हटलंय, 'अमृता राव किती गोड दिलतेयस'. आणखी एका युझरने म्हटलेय, 'अस्सल अप्रतिम सौंदर्य यालाच म्हणतात'.
चंद्रमुखी सिनेमात अमृताने सादर केलेली चंद्रा ही लावणी (Chandra Lavni Song) प्रत्येकाच्या मनात घर करुन आहे. जिथे जाऊ तिथे केवळ चंद्रा हे गाणं ऐकू येत आहे. सिनेमा प्रदर्शित होऊन चार आठवडे झाले असताना सिनेमातील चंद्रा गाण्याने यू ट्यूबवर 2 कोटी व्यूजचा टप्पा पार केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.