Home /News /entertainment /

दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघेंच्या जीवनावर सिनेमा, प्रविण तरडेंनी शेअर केला टीझर

दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघेंच्या जीवनावर सिनेमा, प्रविण तरडेंनी शेअर केला टीझर

Pravin Tarde

Pravin Tarde

कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख निर्माण करणारे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे(Anand Dighe) यांच्या जीवनावर आधारित प्रविण तरडे (Pravin Tarde) घेऊन येत आहेत नवा चित्रपट.

  मुंबई, 29 जानेवारी: “देऊळ बंद”, “मुळशी पॅटर्न” यांसारख्या गाजलेल्या आणि बहुचर्चित आगामी “सरसेनापती हंबीरराव” या चित्रपटानंतर प्रविण तरडे (Pravin Tarde) आता आणखी एक चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट प्रती बाळासाहेब ठाकरे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाण्या जिल्ह्यातील दिवंगत शिवसेना (Shiv Sena )नेते आनंद दिघे(Anand Chintamani Dighe) यांच्या जीवनावर आधारित आहे. प्रवीण यांनी काल आनंद दिघे यांच्या जयंतीचे औचित्य साधत ही घोषणा केली. सोशल मीडियावर मोशन पोस्टर शेअर करत प्रवीण तरडे यांनी ही माहिती दिली. चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः प्रवीण करणार आहे. दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचे नाव ‘धर्मवीर’ असे आहे.
  आनंद दिघे यांची भूमिका कोण साकारणार हे अजूनही स्पष्ट झालेलं नसलं तरी ठाण्यात या चित्रपटाची शूटिंग सुरु झाली आहे. काही दिवसांपूर्वी प्रवीण यांनी मुंबईच्या बीचवरील फोटो शेअर करत या प्रकल्पाची अस्पष्ट माहिती दिली होती. परंतु आता थेट सिनेमाचं मोशन पोस्टर शेअर करत त्यांनी आनंद दिघे यांच्या जीवनपटाची अधिकृत घोषणा केली. चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः प्रवीण करणार आहेत. तर साहिल मोशन आर्ट्स या चित्रपटाची निर्मिंती करणार आहे. मंगेश देसाईंनी सिनेमाची निर्मितीची जबाबदारी उचलली आहे. चित्रपटाची कथा प्रवीण यांचीच आहे. आतापर्यंत प्रविण यांनी मुळशी पॅटर्न, देऊळबंद आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते असे हिट चित्रपट केले आहेत.
  Published by:Dhanshri Otari
  First published:

  Tags: Marathi entertainment, Shivsena

  पुढील बातम्या