मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Pravin Tarde: धर्मवीरच्या दिग्दर्शकाचं Facebook अकाऊंट हॅक; चाहत्यांची मागितली माफी

Pravin Tarde: धर्मवीरच्या दिग्दर्शकाचं Facebook अकाऊंट हॅक; चाहत्यांची मागितली माफी

प्रविण तरडे

प्रविण तरडे

संतोष जुवेकरनंतर अभिनेता दिग्दर्शक प्रविण तरडेचं फेसबुक अकाउंट हॅक झालं आहे. अभिनेत्यानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Minal Gurav

मुंबई. 06 ऑक्टोबर : सोशल मीडिया हे सर्वसामान्यांप्रमाणेच कलाकारांसाठीही महत्त्वाचं झालं आहे. आपल्या चाहत्यांपर्यंत पोहोचण्याचं एकमेव स्ट्राँग माध्यम झालं आहे.  पण सध्या सोशल मीडियावर अकाऊंट हॅक होण्याचं प्रमाण वाढताना दिसतंय. धर्मवीर सिनेमाचा दिग्दर्शक प्रविण  तरडेचं फेसबुक अकाऊंट हॅक झालं आहे. अभिनेत्यानं इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. त्याचप्रमाणे माझ्या फेबसबुकवरून मेसेज आल्यास त्याला रिप्लाय करू नका असं आवाहन केलं आहे.

अभिनेता प्रवीण तरडे सध्या सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय असतो. लागोपाठ आलेल्या सिनेमांमुळे प्रवीणचा सोशल मीडियावरील वावर प्रचंड वाढला आहे. सतत लेटेस्ट अपडेट प्रवीण फेसबुकच्या माध्यमातून देत असतो. अशातच फेसबुक अकाउंट हॅक झाल्यानं प्रवीणला मोठा झटका बसला आहे.  प्रवीणच्या या अकाउंटवरून अनेक खोट्या लिंक्स तसेच फोन नंबरची मागणी केली होत आहे. प्रविणला ही बाब कळताच त्यानं ही माहिती चाहत्यांपर्यंत पोहोचवली आहे.

हेही वाचा - तुमचं Facebook Account हॅक झाल्यास काय कराल? कसं कराल रिकव्हर, वाचा सोपी प्रोसेस

प्रविणनं इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे ज्यात त्यानं म्हटलं आहे की, 'नमस्कार, मी प्रविण विठ्ठल तरडे. माझे फेसबुक अकाउंट हॅक झालं आहे. तिथून अनेक जणांना खोट्य लिंक्स, फोन नंबरची मागणी इ. मेसेज जात आहेत. कोणीही रिप्लाय देऊ नये. धन्यवाद'.

त्याचप्रमाणे प्रविणनं पोस्टच्या कॅप्शनमध्येही स्पष्टीकरण देत माफी माहितली आहे. त्यानं म्हटलंय,  'इन्स्टाग्राम चालू आहे फेसबुक हॅक झालंय. कुठल्याही मेसेजवर विश्वास ठेवू नका. माझं इन्स्टाग्राम फेसबुक लिंक असल्यामुळे हा मेसेज सुध्दा फेसबुकला दिसू शकतो. तसदी बद्दल क्षमस्व'.

केवळ प्रविणचं नाही तर याआधीही अनेक मराठी कलाकारांचं फेसमबुक अकाउंट अशाप्रकारे हॅक झालं आहे. काही दिवसांआधी 'झिम्मा'चा दिग्दर्शक अभिनेता हेमंत ढोमेचं अकाउंट हॅक झालं होत. तर त्याआधी अभिनेता संतोष जुवेकरनंही फेसबुक अकाउंटवरून अश्लिल फोटो व्हिडीओ शेअर करत असल्याचं सांगितलं होतं. संतोष याची रितसर तक्रार सायबर पोलिसांकडे केली होती. तसंच अभिनेत्री शुभांगी गोखले यांचही फेसबुक हॅक झालं होतं. त्यांनीही सायबर पोलिसात याची तक्रार नोंदवली होती.

First published:

Tags: Marathi actress, Marathi cinema, Marathi entertainment, Marathi news