17 मे : रजनीकांतचा जावई धनुष आता हाॅलिवूडमध्ये झळकणार आहे. 'दि एक्स्ट्राऑर्डिनरी जर्नी ऑफ दि फकीर' या सिनेमातून धनुष दिसणारेय. या शूटिंगच्या निमित्तानं धनुष मुंबईच्या रस्त्यांवर दिसला होता.
रोमान पोर्टुलासच्या कादंबरीवर हा सिनेमा आहे. या सिनेमाचं शूटिंग मुंबई, पॅरिस, रोम, ब्रसल्स इथे होणारेय. शूटिंगचे फोटोज वायरल झालेत.
सिनेमाचं दिग्दर्शन करतोय केन स्काॅट. एका मुलाखतीत केननं धनुषच्या अभिनयाचं खूप कौतुक केलं. तो म्हणाला, 'धनुषची नाचण्याची आणि गाण्याची अशी वेगळी स्टाइल आहे. त्यामुळे तो वेगळा ठरतो. '
सिनेमाची रिलीज डेट अजून ठरायचीय. धनुषसोबत सिनेमात एरिन मोरिआर्टी, सीमा बिस्वास आणि लाॅरेन लफिट यांच्या भूमिका आहेत.
Loading...#Dhanush @dhanushkraja from his hollywood debut flick #TheExtraordinaryJourneyOfTheFakir. pic.twitter.com/o4ZpTf8Tvd
— Ajay V (@kollyempire) May 16, 2017
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा