Home /News /entertainment /

dhanush aishwarya divorce : धनुष आणि ऐश्वर्या झाले वेगळे, ट्वीटरवर केली घटस्फोटाची घोषणा

dhanush aishwarya divorce : धनुष आणि ऐश्वर्या झाले वेगळे, ट्वीटरवर केली घटस्फोटाची घोषणा

धनुषचे लग्न सुपरस्टार रजनीकांत यांची थोरली मुलगी ऐश्वर्याबरोबर 18 नोव्हेंबर 2004 मध्ये झाले. त्यांच्या लग्नाची खूप चर्चा रंगली होती

    मुंबई, 17 जानेवारी : ‘कोलावरी डी’ या गाण्यानं सर्वांना वेड लावणाऱ्या साउथ स्टार धनुष (Dhanush ) आणि ऐश्वर्याबद्दल (Aishwarya ) धक्कादायक बातमी आहे. धनुष आणि ऐश्वर्याने वेगळा होण्याचा निर्णय घेतला आहे. खुद्द धनुषने याबद्दल ट्वीट करून आम्ही वेगळ होत असल्याचे जाहीर केले आहे. धनुषच्या ट्वीटमुळे एकच खळबळ उडाली आहे.  (Dhanush and Aishwarya divorce) धनुष याने ट्वीट करून आम्ही वेगळ होत असल्याचे जाहीर करत 18 वर्षांच्या संसाराला पूर्णविराम दिला आहे. 'आम्ही मागील १८ वर्षांपासून एकत्र होता. खूप चांगला हा प्रवास होता. कुटुंबीयांचा आशीर्वाद होता. पण आम्ही आता दोघांही वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आमच्या या निर्णयाचा सर्वांनी स्वीकार करावा', असं सांगत धनुष यांने घटस्फोट घेत असल्याचे जाहीर केले. धनुष आणि ऐश्वर्यानं 2004 मध्ये बांधली लग्नगाठ धनुषचे लग्न सुपरस्टार रजनीकांत यांची थोरली मुलगी ऐश्वर्याबरोबर 18 नोव्हेंबर   2004 मध्ये झाले. त्यांच्या लग्नाची खूप चर्चा रंगली होती.त्यांच्या लग्नात कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली होती. लग्नात येणाऱ्या पाहुण्यांना आमंत्रण पत्रिका दाखवूनच आत सोडण्यात येत होते. धनुष आणि ऐश्वर्या दोन मुलांचे आई-वडील असून त्यांच्या मुलांची नावे याथरा आणि लिंगा अशी आहेत. धनुषचे खरे नाव वेंकटेश प्रभू आहे. कस्तूरी राजा यांच्या 'आदुकलाम' (2011) या सिनेमात धनुषने काम केले होते. या सिनेमातील भूमिकेसाठी समीक्षकांनी त्याचे कौतुक केले होते. या सिनेमासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. धनुष आणि ऐश्वर्याची पहिली भेट धनुष आणि ऐश्वर्याची पहिली भेट एका कार्यक्रमादरम्यान झाली होती. धनुषने याबद्दल एका मुलाखतीत सांगितलं होते की, '‘काढाल कोंडे' हा सिनेमा सहपरिवार पाहायला गेला होता. तेव्हा सिनेमाहॉलच्या मालकाने रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या आणि सौंदर्या हिची ओळख करून दिली होती. त्यावेळी आमच्यात फक्त हाय हॅलो झालं. नंतर सकाळी ऐश्वर्या मला दुसऱ्या दिवशी एक फुलांचा बुके पाठवला. त्यानंतर आम्ही भेटत राहिलो. ती माझ्या बहिणीची मैत्रिण देखील होती. नंतर आमची मैत्री झाली. या कारणाला कंटाळून घेतला लग्नाचा निर्णय त्यावेळी धनुष त्याच्या सिनेमामुळे चर्तेत होता. तर ऐश्वर्या फिल्म डायरेक्टर असल्यासोबत रजनीकांत यांची मुलगी असल्यामुळे देखील चर्चेत होती. दोघे चांगले मित्र होते मात्र दोघांच्यात काही तरी शिजत असल्याची सतत मीडियात चर्चा होती. या अफवांच्यामुळे दोन्ही कुटुंबातील लोक वैतागले होते. यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी धनुष 21 वर्षाचा होता व  ऐश्वर्या 23 वर्षाची होती.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या