मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Dhanush-Aishwarya: काही महिन्यांपूर्वी घटस्फोटाची घोषणा,आता विचार बदलला; धनुष-ऐश्वर्याचं नेमकं चाललंय काय?

Dhanush-Aishwarya: काही महिन्यांपूर्वी घटस्फोटाची घोषणा,आता विचार बदलला; धनुष-ऐश्वर्याचं नेमकं चाललंय काय?

धनुष-ऐश्वर्या

धनुष-ऐश्वर्या

मनोरंजनसृष्टीत गेल्या काही दिवसांपासून घटस्फोटाचा जणू ट्रेंडच सुरु असल्याचं दिसून येत आहे. या काही महिन्यांमध्ये अनेक सेलिब्रेटी जोडप्यांनी घटस्फोट घेतला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India
  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 5 ऑक्टोबर-  मनोरंजनसृष्टीत गेल्या काही दिवसांपासून घटस्फोटाचा जणू ट्रेंडच सुरु असल्याचं दिसून येत आहे. या काही महिन्यांमध्ये अनेक सेलिब्रेटी जोडप्यांनी घटस्फोट घेतला आहे. काहींनी लग्नाच्या दोन-तीन वर्षात तर काहींनी तब्बल लग्नाच्या 15 वर्षानंतर हे पाऊल उचललं आहे. यामध्ये साऊथ स्टार धनुष आणि ऐश्वर्या यांचादेखील समावेश होतो. काही महिन्यांपूर्वी धनुष आणि ऐश्वर्याने आपण विभक्त होत असल्याचं सांगत घटस्फोटाची घोषणा केली होती. दरम्यान आता अभिनेता आपल्या लग्नाला दुसरी संधी देण्यासाठी तयार असल्याचं वृत्त समोर येत आहे.

साऊथ सुपरस्टार धनुष आणि सुपरस्टार रजनीकांत यांची लेक ऐश्वर्याने आपल्या घटस्फोटाची घोषणा करत सर्वांनाच मोठा धक्का दिला होता. त्यांच्या या निर्णयाने रजनीकांत यांच्यासोबतच चाहतेसुद्धा प्रचंड निराश झाले होते. या दोघांनी पुन्हा होती. दरम्यान आता आणखी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार या दोघांनी आपला निर्णय बदलल्याचं सांगण्यात येत आहे. जानेवारीमध्ये या दोघांनी आपल्या घटस्फोटची घोषणा केली होती. त्यानंतर आता हे जोडपं आपल्या लग्नाला दुसरी संधी देऊ इच्छित असल्याचं म्हटलं जात आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, रजनीकांत यांच्या निवासस्थानी या संदर्भात दोन्ही कुटुंबाची बैठक घेण्यात आली होती. यावेळी रजनीकांत यांनी आपल्या लेकीचा संसार वाचवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केल्याचं सांगितलं जात आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारी महिन्यात धनुष आणि ऐश्वर्याने आपल्या घटस्फोटाची घोषणा करत सोशल मीडियावर एक पोस्टदेखील शेअर केली होती. यामध्ये लिहण्यात आलं होतं की, 'आम्ही मित्र,कपल आणि आईबाबा म्हणून तब्बल 18 वर्षे एकत्र घालवले आहेत. परंतु आता आमचे मार्ग विभक्त होताना दिसून येत आहेत. आता या टप्प्यावर स्वतःला समजून घेण्यासाठी आम्हाला वेळ हवाय. त्यामुळे आमच्या निर्णयाचा आदर करा. आणि आम्हाला काही काळासाठी एकांत द्या. ज्याने आम्हाला या परिस्थितीशी सामना करण्यासाठी ताकत मिळेल'. असं लिहत या दोघांनी आपला निर्णय जाहीर केला होता.

धनुष-ऐश्वर्या लव्हस्टोरी-

या दोघांची भेट एका फिल्मी समारंभात झाली होती. . धनुष चित्रपट ‘काढाल कोंडे’ पाहायला गेला होता. तिथे त्याची भेट रजनीकांत यांच्या दोन्ही मुली ऐश्वर्या आणि सौंदर्यशी झाली होती. पहिल्याच भेटीत धनुष ऐश्वर्याच्या प्रेमात पडला होता. तर ही लव्हस्टोरी दोन्ही बाजूंनी सुरु झाली होती.

(हे वाचा:Ali Fazal And Richa Chadha: अली-रिचाचं मुंबईत ग्रँड रिसेप्शन; कतरिना शिवाय एकटाच पार्टीत पोहोचला विकी कौशल )

त्यांनतर धनुष आणि ऐश्वर्याच्या भेटीगाठी सुरु झाल्या होत्या.धनुष आणि ऐश्वर्याच्या अफेअरच्या जोरदार चर्चा रंगू लागल्या होत्या. तेव्हा त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना लग्न करण्याचा सल्ला दिला होता. त्यावेळी धनुष केवळ 21 तर ऐश्वर्या 23 वर्षांची होती. धनुष आणि ऐश्वर्याचं 18 नोव्हेंबर 2004 मध्ये लग्न झालं होतं. त्यांना दोन मुलेही आहेत

First published:

Tags: Entertainment, South indian actor