मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Dhanashri Kadgaonkar : 'रक्षाबंधनाला ओवाळणीत एक रुपया मिळायचा'; धनश्री काडगावकरनं सांगितली ती आठवण

Dhanashri Kadgaonkar : 'रक्षाबंधनाला ओवाळणीत एक रुपया मिळायचा'; धनश्री काडगावकरनं सांगितली ती आठवण

आता शिल्पी म्हणून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला तयार झालेली अभिनेत्री धनश्री काडगावकरनं भावाची रक्षाबंधनाची आठवण सर्वांबरोबर शेअर केली आहे.

आता शिल्पी म्हणून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला तयार झालेली अभिनेत्री धनश्री काडगावकरनं भावाची रक्षाबंधनाची आठवण सर्वांबरोबर शेअर केली आहे.

आता शिल्पी म्हणून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला तयार झालेली अभिनेत्री धनश्री काडगावकरनं भावाची रक्षाबंधनाची आठवण सर्वांबरोबर शेअर केली आहे.

  मुंबई, 09 ऑगस्ट:  श्रावण सुरू झाल्यावर एकामागोमाग एक सणांना सुरुवात होते. नागपंचमी झाली की बहिण भावाच्या प्रेमाचा सण येतो तो म्हणजे रक्षबंधन. यंदाच्या रक्षबंधनाला दोन दिवस उरले आहेत. सगळीकडे भाऊ बहिणींचा उत्साह सुरू झालाय. बहिणीला रक्षाबंधनाला काय गिफ्ट द्यायचं इथपासून ओवाळीत मिळालेल्या पैशातून काय खरेदी करायचं इथपर्यंत भावा बहिणींचं प्लानिंग सुरू झालं आहे. सगळ्यांसारखी कलाकारांची रक्षाबंधनही खास असते. वहिनीसाहेब म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्री धनश्री काडगावकरनं  रक्षाबंधनानिमित्त तिच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. भावाबरोबर लहानपणी रक्षाबंधनाला काय धम्माल करायचे याविषयी देखील धनश्रीनं सांगितलं आहे. अभिनेत्री धनश्री काडगावकर लहानपणीच्या आठवणी सांगताना धनश्रीनं लहानपणी ओवाळणीत मला एक रुपया मिळायचं असं सांगितलं. सौरभ काडगावकर असं धनश्रीच्या भावाचं नाव आहे. दोघेही बहिण भाऊ एकमेंकावर प्रचंड प्रेम करतात. रक्षाबंधनाची आठवण सांगताना धनश्री म्हणाली, 'आम्ही लहानपणी खुप भांडायचो ,भन्नाट मस्ती करायचो पण ते तेवढ्यापुरतच असायचं. लहानपणी रक्षाबंधनाला भावाकडे मला देण्यासाठी छानशी भेट वस्तू असायची, पण मला मुद्दाम चिडवण्यासाठी एक रुपया द्यायचा'. हेही वाचा - Srushti Pagare : स्वामीनीतील छोटी रमा दिसणार नव्या भूमिकेत; 'या' मालिकेत साकारणार महत्वाची भूमिका धनश्री आता झी मराठीवरील 'तु चाल पुढं' या नव्या मालिकेत शिल्पीच्या भूमिकेत दिसणार आहे. मालिकेचं शुटींग सुरू झालं आहे. त्यामुळे कलाकारांना शुटींगमधून वेळ काढून सण साजरे करण्यासाठी घरी जाता येत नाही. यंदाची रक्षाबंधन कशी साजरी करणार असं विचारल्यावर धनश्री म्हणाली, 'रक्षाबंधनाच्या अनेक मधुर आठवणी आहेत. पण या वर्षी कामात बिधी असल्यामुळे भेट होईल की नाही शंका आहे पण आम्ही नक्की रक्षाबंधन साजरे करु'.
  धनश्रीचं तिच्या भावंडांबरोबर फार प्रेमाचं नात आहे. दरवर्षी धनश्री भावांबरोबर रक्षाबंधन साजरी करते. तिच्या सोशल मीडियावर ती दरवर्षी रक्षाबंधन आणि भाऊबीजेचे फोटो शेअर करत असते. यंदाचं वर्ष धनश्रीसाठी खास असणार आहे कारण यावेळी धनश्रीचं बाळ म्हणजेच कबीर देखील रक्षाबंधन साजरं करणार आहे. तर दुसरीकडे रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर धनश्रीची नवी मालिका देखील सुरू झाली आहे. अभिनेत्रीच्या नव्या मालिकेसाठी प्रेक्षकांनी उत्सुकता दाखवली आहे. तु चाल पुढं ही मालिका 8 ऑगस्टपासून झी मराठीवर सुरू झाली आहे. यावेळी ही धनश्री निगेटिव्ह भूमिकेत दिसणार आहे. वहिनीसाहेबांपेक्षा शिल्पी किती वरचढ ठरणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष आहे.
  Published by:Minal Gurav
  First published:

  Tags: Marathi actress, Marathi entertainment, Raksha bandhan

  पुढील बातम्या