Home /News /entertainment /

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी युजवेंद्र चहलची बायको म्हणतेय, 'दारु बदनाम...' पाहा VIDEO

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी युजवेंद्र चहलची बायको म्हणतेय, 'दारु बदनाम...' पाहा VIDEO

युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि धनश्री वर्मा (Dhanashree Verma) नुकतेच लग्नबंधनात अडकले. धनश्री स्वत: एक उत्तम डान्सर असून तिचा नवा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

मुंबई, 23 डिसेंबर: इंडियन टीमचा स्पिनर युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि कोरिओग्राफर आणि युट्युबर धनश्री वर्मा (Dhanashree Verma) नुकतेच विवाहबंधनात अडकले. ऑगस्ट महिन्यात चहल आणि धनश्री वर्मा यांचा साखरपुडा झाला होता. त्यानंतर त्यांनी लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. चहलची पत्नी धनश्री अतिशय सुंदर डान्सर असून तिची स्वतःची डान्स अॅकॅडमीदेखील आहे. त्याचबरोबर ती डॉक्टर सुद्धा आहे. सध्या तिचा एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत असून यामध्ये ती 'दारू बदनाम करदी' या गाण्यावर डान्स करताना दिसून येत आहे. धनश्रीचा हा व्हिडीओ जुनाच असला तरी त्यांच्या लग्नानंतर पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. धनश्री ही मुंबईची असून ती टिकटॉकवर(TikTok) देखील सक्रीय होती. भारतीय क्रिकेटपटूची पत्नी होणार असे सोशल मीडियावर समजल्यानंतर तिची लोकप्रियता आणि सोशल मीडियावरील फॉलोअर्सची संख्या वाढली. धनश्रीने आपल्या युट्यूब (YouTube)  अकाऊंटवरून हा डान्सचा व्हिडीओ टाकल्यानंतर तिच्या या डान्सचं फॅन्सकडून प्रचंड कौतुक केलं जात आहे. युट्युबवर तिचे 20 लाख सब्सक्रायबर्स आहेत. या व्हिडिओला आतापर्यंत 73 लाख लोकांनी पाहिलं असून युजवेंद्र चहल देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कार्यरत असतो. टिकटॉकवर बंदी येण्याआधी तो खूप व्हिडीओ शेअर असे. दरम्यान, इंस्टाग्रामवर(Instagram) देखील धनश्रीचे लाखो फॉलोअर्स असून जवळपास 25 लाख फॉलोअर्स तिचे आहेत. इंस्टाग्रामवर देखील ती आपल्या डान्सचे अनेकल व्हिडीओ अपलोड करत असते. नुकतीच ती आयपीएल(IPL) दरम्यान दुबईमध्ये चहल आणि त्याची टीम आरसीबीला चिअर करण्यासाठी यूएईला(UAE) गेली होती. बॉलिवूडमधील गाण्यांवर ती डान्स करते. युजवेंद्र चहल सध्या भारतात असून ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील टेस्ट सिरीजमध्ये(Ind vs Aus) त्याची निवड झालेली नाही. त्यानंतर आता पुढील महिन्यात इंग्लडचा संघ भारत दौऱ्यावर येणार असून त्यासाठी चहल प्रॅक्टिस सुरु करणार आहे. या दोघांची केमेस्ट्री चांगली जमत असल्याचं याआधीच सोशल मीडियावरील त्यांच्या पोस्टमधून दिसत होतं. पण आता तर ते पती-पत्नी झाले आहेत त्यामुळे चहल धनश्रीच्या तालावर नाचतो का? हेच पहायचं आहे.
Published by:Amruta Abhyankar
First published:

Tags: Videos viral, Yuzvendra Chahal

पुढील बातम्या